Header Ads Widget

Responsive Advertisement

महाराष्ट्र दहावी बोर्डाचा निकाल दिं-17 जुनला दु.1.00 जाहीर होणार! p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

 वृत्तसंस्था / मुंबई : आज 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर,  निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे.


दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.

मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.

Post a Comment

0 Comments