Header Ads Widget

Responsive Advertisement

लच्छुराम ऊर्फ़ लकीकुमार ओक्सा (38) यांची नक्षल्यांनी पोलिस मित्र असल्याच्या संशयावरून केली हत्या! p10news

 

लच्छुराम ऊर्फ़ लकीकुमार ओक्सा (38) यांची नक्षल्यांनी पोलिस मित्र असल्याच्या संशयावरून केली हत्या!


गडचिरोली(मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR In CHIEF): पोलीस खबरी असल्याच्या सशंयावरुन नक्षल्यांनी काल रात्री भामरागड तालुक्यातील मलमपोडुर येथील एका तेंदुपत्ता फडी मुंशीची तीक्ष्ण शस्ञाने हत्या केली.लच्छुराम ऊर्फ़ लकीकुमार ओक्सा (38) असे मृत फडी मुंशीचे नाव असुन तो बिनागुंडा जवळच्या गुसेवाडा येथील मुळ रहिवासी होता.

लच्छुराम ऊर्फ़ लकीकुमार ओक्सा (38) यांची नक्षल्यांनी पोलिस मित्र असल्याच्या संशयावरून केली हत्या!


लकीकुमार ओक्सा हा भामरागड तालुक्यातील मलमपोडुर येथे तेंदुपत्ता फळीवर मुंशी म्हणुन काम पाहात होता. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास सशस्ञ नक्षलवादी मलमपोडुर येथे गेले.त्यांनी लकीकुमारला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणी नंतर तीक्ष्ण शस्ञाने त्याची हत्या केली.व गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकुन दिला.सकाळी पातर्विधिसाठी जाणाऱ्या काही लोकांना त्याचा मृतदेह आढळून आला.याची माहीती पोलीसांना देण्यात आली.उल्लेखनीय आहे की लच्छुराम हा जिल्हात छोटी मोठी ठेकेदारी करायचा त्याची संपूर्ण जिल्हाभर विविध राजकीय,प्रशासकीय आणी ईतर व्येक्ती संस्थाशी संबध होते. काही दिवसांपूर्वी त्याझा एक्सीडेंट झाला होता.त्यानंतर तो मलमपोडुर येथे फडंमुशी म्हणुन काम करत होता.या परीसरात दहशदिचा वातावरण झाला आहे.

Post a Comment

0 Comments