Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलिस भरती-2022-लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र दिं-11/06/2022आजपासून उपलब्ध होणार p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

 गडचिरोली पोलिस भरती-2022-लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध होणार
गडचिरोली पोलिस भरती-2022 लेखी परीक्षा दिनांक 19/06/2022 वार रविवार आहे.


 गडचिरोली/11:-तरी उमेदवारांना आज दिनांक 11/06/2022 रोज शनिवार पासुन पोलिस भरती-2022 च्या लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र (हॉल टिकिट) उपलब्ध होतील.उमेदवारांना दोन वेगवेगळ्या माध्यमातून प्रवेशपत्र (हॉल टिकेट) उपलब्ध करून देण्यात आले आहे.ज्या 1)उमेदवारांनी ज्या पोस्टे/उपपोस्टे/पोमके/पोलीस मुख्यालयामध्ये आवेदन अर्ज भरून सादर दाखल केले आहे.त्याच ठिकाणी लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील.2) उमेदवारांनी आपल्या आवेदन अर्जावर दिलेल्या वैयक्तिक इ-मेल आयडीवर  लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.उमेदवारांनी तपासून प्रवेशपत्रात काही बदल असल्यास तसेच काही अडचण उद्धभवत असल्यास त्यांनी समाधान कक्ष, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्य मो.क्र.8806312100 या क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून आपल्या समस्येचे निराकरण केले जाईल.

Post a Comment

0 Comments