Header Ads Widget

Responsive Advertisement

इंजिनीयर भारी पडला, ३५ रुपयांसाठी ५ वर्षे लढला; आता रेल्वेला २.४३ कोटी द्यावे लागणार p10news

 

इंजिनीयर भारी पडला, ३५ रुपयांसाठी ५ वर्षे लढला; आता रेल्वेला २.४३ कोटी द्यावे लागणार

p10news.@gmail.com, Updated: Jun 1, 2022, 5:31 PM

रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम परत करताना रेल्वेनं १०० ऐवजी ६५ रुपये परत केले. त्यानंतर इंजिनीयर तरुणानं आणखी ३५ रुपये मिळवण्यासाठी ५ वर्षे संघर्ष केला. ५० आरटीआय आणि सरकारच्या ४ विभागांशी पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर तरुणाला ३५ रुपये मिळणार आहेत.

हायलाइट्स:

रेल्वेकडून रिफंड मिळवण्यासाठी तरुणाचा संघर्ष

इंजिनीयर तब्बल ५ वर्षे रिफंडसाठी लढला

आता जवळपास ३ लाख जणांना होणार फायदा

बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड कराmans 5 year fight to get rs 35 refund


३५ रुपये मिळवण्यासाठी तरुणाचा ५ वर्षे संघर्ष


Adv: समर सेल - फॅन आणि एअर कुलर्सवर मिळवा ६० टक्क्यांपर्यंत सूट


Subscribe to Notifications

कोटा: राजस्थानच्या कोटा येथील एका अभियंत्यानं रेल्वेकडून ३५ रुपयांचा रिफंड मिळवण्यासाठी ५ वर्षे लढा दिला. आता त्याच्या लढ्याला यश आलं असून त्याच्या या लढ्याचा फायदा जवळपास ३ लाख प्रवाशांना होणार आहे. रेल्वेनं यासाठी २.४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम रिफंड म्हणून आयआरसीटीसीच्या २.९८ लाख वापरकर्त्यांना देण्यात येईल.


कोटा येथे वास्तव्यास असलेल्या सुजीत स्वामी यांनी रेल्वेकडून ३५ रुपये रिफंड मिळवण्यासाठी ५ वर्षे संघर्ष केला. स्वामी यांनी जवळपास ५० माहिती अधिकार अर्ज केले. सरकारच्या ४ विभागांना पत्रं लिहिली. अखेर स्वामी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. आता स्वामी यांना ३५ रुपयांचा रिफंड मिळेल. त्यासोबतच स्वामी ज्या परिस्थितीतून गेले, त्याच परिस्थितीतून गेलेल्या २.९८ लाख जणांनादेखील रिफंड मिळेल.


undefined

कुटुंबाकडून ताटातूट, कोर्टामुळे पुन्हा अतूट; केरळच्या लेस्बियन कपलला दिलासाआयआरसीटीसीनं स्वामी यांच्या आरटीआयला उत्तर दिलं. जीएसटी येण्यापूर्वी तिकीट बुक केलेल्या २.९८ लाख जणांना प्रत्येक तिकिटामागे ३५ रुपयांचा रिफंड देण्यात येईल. त्यासाठी २.४३ कोटी रुपयांचा खर्च येईल, असं उत्तर आयआरसीटीसीनं आरटीआय अर्जाला दिल्याचं स्वामी यांनी सांगितलं. रिफंड मिळवण्यासाठी स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्रालय, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जीएसटी परिषद आणि अर्थ मंत्रालयाला टॅग करून अनेक ट्विट केली.


नेमकं काय घडलं होतं?

सुजीत स्वामी यांनी कोट्याहून नवी दिल्लीला जाण्यासाठी गोल्डन टेम्पल मेलचं तिकीट एप्रिल २०१७ मध्ये बुक केलं. सुजीत २ जुलैला प्रवास करणार होते. १ जुलै २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला. सुजीत स्वामींनी तिकीट रद्द केलं. त्यांचं तिकीट ७६५ रुपयांचं होतं. तिकीट रद्द केल्यानंतर त्यांना ६६५ रुपये परत मिळाले. १०० रुपये आयआरसीटीसीनं कापले. खरंतर रेल्वेनं ६५ रुपये कापणं अपेक्षित होतं. त्यानंतर स्वामींनी ३५ रुपये परत मिळवण्यासाठी आरटीआयच्या माध्यमातून संघर्ष सुरू केला.


'स्पॉटलाइट बंद करा...' कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटल्याने अखेरच्या क्षणी काय म्हणाले होते केके?


तिकीर रद्द करण्यात आल्यानंतर १०० रुपये कसे कापले, असा स्वामी यांचा सवाल होता. ६५ रुपये लिपिक शुल्क, तर ३५ रुपये शुल्क म्हणून कापण्यात आल्याचं उत्तर रेल्वे मंत्रालयानं दिलं. त्यावर तिकीट बुक केलं, त्यावेळी जीएसटी लागूच झाला नव्हता. मग ३५ रुपये शुल्क कसं काय आकारलं, असा सवाल स्वामींनी केला. अखेर रेल्वेनं त्यांना ३५ रुपये रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा आणखी २.९८ लाख लोकांनादेखील होणार आहे.

अंजनी की किष्किंधा? हनुमानाचं जन्मस्थळ नेमकं कोणतं?


    

महत्वाचे लेख

VIDEO | पैशांचा माज! कार चालवताना नोटांची बंडलं उडवली, पोलिसांनी अद्दल घडवली


या बातम्यांबद्दल अधिक वाचा

रेल्वे तिकीट रिफंडभारतीय रेल्वे न्यूजभारतीय रेल्वेकोटाआयआरसीटीसीrailway ticket refundkotairctcindian railwayindian rail news

Web Title : mans 5 year fight to get rs 35 refund on cancelled railway ticket benefits around 3l irctc users


Marathi NewsIndia NewsMans 5 Year Fight To Get Rs 35 Refund On Cancelled Railway Ticket Benefits Around 3l Irctc Users


Post a Comment

0 Comments