Header Ads Widget

Responsive Advertisement

ज्ञानवापी मशिदीवर 'सुप्रिम' निकाल: शिवलिंगची जागा सुरक्षित ठेवा अन् नमाज सुरु ठेवा p10news

   हिंदू पक्षाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस


                                                     

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे (gyanvapi mandir masjid) सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)मोठे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग (shiv ling)सापडले आहे ती जागा सुरक्षित ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.मुर्ती सापडल्यानंतरही ज्ञानवापी मशिदची जागा हिंदुना मिळणार नाही.कारण---

17 May, 2022, 7:30 pm

gyanvapi masjid

मंदिर-मशिदशी (mandir masjid)वादात वाराणसीच्या न्यायालयाने (court) ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधा मुस्लिम पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मंगळवारी हिंदू पक्षालाही सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली.

वाराणसीमधील दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने ज्ञानवापी मशीदीची जागा ही हिंदूंची असल्याचा दावा केलाय. मुघल बादशाह औरंगजेबने १६६४ साली २००० वर्ष जुन्या काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून त्या जागी ज्ञानवापी मशीद बांधली, असंही या याचिकाकर्त्याने म्हटले आहे. या वादासंदर्भात वाराणसीमधील स्थानिक न्यायालयाने पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाची परवानगी दिली आहे.

पुराण काळापासून येथे भगवान शंकराची स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाला विश्वेश्वर म्हणून ओळखलं जातं. या भूमीवर मुस्लीमांनी आक्रमण करण्याच्या खूप आधीपासून हे मंदिर बांधण्यात आलं होतं. हे मंदिर २०५० वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्यने बांधल्याचं सांगितलं जातं. येथे भगवान विश्वेश्वराचं मंदिर आहे. धार्मिक कारणांमुळे या मंदिराचा काही भाग देशामध्ये मुस्लीम राज्य कर्त्यांची सत्ता होती तेव्हा पाडण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय.

Post a Comment

0 Comments