Header Ads Widget

Responsive Advertisement

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या। p10news

                               

          नक्षल्यांनी केली युवकाची हत्या
    गडचिरोली:- मंदीप गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)                                                                        एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मेड्रि येथे नक्षलवाद्यांनी एका आदिवासी युवकाची हत्या केल्याची घटना दिं.14 मे शनिवार ला घडली.

रामजी दसरु तिम्मा वय 39 वर्ष असे नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रामजी ला नक्षलवाद्यांनी राहत्या घरातुन झोपेतुन उठवून नेले.शनिवारी सकाळी रामजी चा मृतदेह रामनटोला रस्त्यावर आढळुन आला.त्याच्या डोक्यावर व पोटावर कु-हाडीचे घाव घालून हत्या केल्याचे दिसुन आले.मृतदेहाच्या शेजारी आढळुन आलेल्या पञकात रामजी हा पोलिस खबरी असल्याने त्याला सजा दिली असे नमूद करण्यात आले आहे.रामजी तिम्मा याने 2010 साली नक्षली चळवळीला कंटाळून दलम मधुन बाहेर पडला व गडचिरोलीला पोलिंसासमोर आत्मसमर्पण केले होते.त्याच्या हत्येने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

घटनेचा पुढिल तपास हालेवारा पोलिस करित आहे.                                        

Post a Comment

0 Comments