Header Ads Widget

Responsive Advertisement

दिनांक 27 मे रोजी राज्यव्यापी उदयमिता यात्रेचे आयोजन p10news

 


एम.एम.गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF) 

*दिनांक 27 मे रोजी राज्यव्यापी उदयमिता यात्रेचे आयोजन

गडचिरोली,:-दि.19: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व युथ ऐड फाऊंडेशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता सुक्ष्म व्यवसाय,कौशल्य विकास आणि तरुणांचा प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राजव्यापी उदयमिता यात्रेचे आयोजन करण्यांत आले आहे. उदयमिता यात्रा 27 मे 2022 पासून गडचिरोली जिल्हयात सुरु होणार आहे.

   राज्यातील सर्व जिल्हयामधून जनजागृती करत ही यात्रा 27 मे रोजी गडचिरोली जिल्हयात दाखल होणार आहे.गोंडवन कला केंद्र,पोटेगांव बायपास रोड गडचिरोली येथे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीज संपन्न होणार आहे. राज्यातील सर्व जिल्हयामध्ये एकुण 40 दिवसाचा प्रवास यात्रेद्वारे करण्यांत येणार आहे.

  यात्रेमध्ये 40 उद्योजकता प्रशिक्षक सहभागी होणार असून हे प्रशिक्षक सुमारे 40 हजारातून अधिक युवकांना भेटतील,त्यांना सुक्ष्म व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण देतील.त्याचबरोबर शाळा,महाविद्यायालयांमध्ये उदयोजकते बद्दल जागरुकता निर्माण करण्यांत येणार आहे. ज्यांच्याकडे उदयोगाच्या नवनव्या कल्पना आहेत,अशा युवकांशी संवाद साधण्यांत येणार आहे.

युवकांमध्ये उदयोजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येतील.प्रत्येक जिल्हयात तीन दिवसांच्या उदयोजकता प्रशिक्षणाच्या कार्यक्रमही राबविण्यांत येणार आहे. त्याचबरोबर सर्व 36 जिल्हयामध्ये डिसेंबर -2022अखेर चार हजार सुक्म्श व्यवसाय सुरु करण्यासाठी विपणन सहाय्य प्रदान करण्याबरोबरच संबंधित युवकांनी प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना शक्य असेल त्या सरकारी योजनांशी जोडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली ,सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments