Header Ads Widget

Responsive Advertisement

सन 2019पासुन कारवाई न केल्यामुळे मा.लोकायुक्त म.रा. मुंबई यांच्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली व तहसील कार्यालय गडचिरोली यांच्या कडून अवहेलना p10news

 

मंदीप एम, गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)

मा.लोकायुक्त म.रा. मुंबई यांच्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली व उपविभागीय अधिकारी गडचिरोली/तहसील कार्यालय गडचिरोली यांनी केली अवहेलना.


गडचिरोली/दिं,01:-मा.उप लोक आयुक्त,म.रा.यांच्याकडे तक्रारदार श्री मंदीप एम गोरडवार यांनी मा.लोकायुक्त यांच्याकडे मौजा मुरखळा(नवेगाव) येथील जुना सर्वे नं.137/नविन सर्वे नं.119च्या घोटाळ्यात दोषी असणा-यावर गुन्हे दाखल करुन भुखंड परत मिळणे बाबत केलेल्या तक्रारीवर ,सन दिनांक 0 7/11/2019 सर्वे नं.जुना 137 /नवीन सर्वे.नं.119/120/121, प्रकरणी मा.उप लोक आयुक्त यांच्या समक्ष सुनावणी झाली होती.या सुनावणी नंतर उपलोकायुक्क्त यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांना तक्रार करता यांच्याकडे असलेले कागदपत्रे तपासून योग्य कारवाई करुन संबंधित भ्रष्टाचार केलेल्या प्लाट विक्रते व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन तक्रारदारास भुखंड परत देण्यात यावे असे सुनावणी आदेश दिले.परंतु  लोक आयुक्त म.रा.मुंबई, यांच्या आदेशाची जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडून गांभिर्याने दखल घेऊन वारंवार उपविभागीय दंडाधिकारी गडचिरोली व तहसीलदार तहसील कार्यालय गडचिरोली यांना सतत पत्र देऊन कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर सुध्दा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तहसील कार्यालय गडचिरोली सतत लोकायुक्त कार्यालय मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या आदेशानुसार कारवाई न करता आदेशाची अवहेलना करित आहेत.


Post a Comment

0 Comments