Header Ads Widget

Responsive Advertisement

आष्टी पोलिस स्टेशनची मोठी कामगिरी , चारचाकी वाहनासह केला 11,22,000/- रुपयांचा माल जप्त. P10NEWS

    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

“आष्टी पोलीस स्टेशनची धडक कारवाई”

चारचाकी वाहनासह केला 11,22,000/- रुपयाचा माल जप्त.

    गडचिरोली/दिनांक (31) - गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री  व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सा. यांनी अवैध दारु विक्री करणा­यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.


    आज दिनांक 31/08/2023 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आष्टीचे प्रभारी अधिकारी श्री. कुंदन गावडे यांना मिळालेल्या गोपणीय बातमीवरुन पोउपनि. पवार, सफौ/काळे, पोहवा/करमे, पोअं/नागुलवार, पोअं/तोडासे, पोअं/गोडबोले, पोअं/रायशिडाम, पोअं/ पंचफुलीवार असे मौजा मार्कंडा कंसोबा फाटा येथे नाकाबंदी करीत असतांना, गोंडपिपरी ते आष्टी या मार्गे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. एम एच 30 ए बी 2602 ही आल्याने सदर वाहनास पोलीस स्टाफने थांबविण्याचा ईशारा दिला.  परंतू वाहन चालक वाहन न थांबविता आलापल्ली रोडने निघुन गेला.  त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहनाचा पाठलाग केला असता, बोलेरो पिकअप वाहन क्र. एम एच 30 ए बी 2602 चा चालक मौजा चंदनखेडी (वन) येथील रस्त्यावर वाहन उभी करुन जंगलात पळुन गेला.  त्यानंतर पोलीस स्टाफने सदर वाहन चेक केले असता, त्यामध्ये 1) 90 एम एल मापाचे 55 सिलबंद बॉक्स किंमत 5,50,000/- रुपये, 2) 375 एम एल मापाचे 05 सिलबंद बॉक्स किंमत 72,000/- रुपये, 3) बोलेरो मॅक्सी ट्रक बनावट वाहन क्रमांक एम एच 30 ए बी 2602 किंमत 5,00,000/- रुपये असा एकुण 11,22,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सदर गुन्ह्रात जप्त केलेले वाहन क्रमांक हे बनावटीकरण असल्याचे व अज्ञात चालक हा जंगलाचा फायदा घेवुन फरार झालेला असल्याचे दिसुन आल्याने पोलीस स्टेशन आष्टी येथे सदर अज्ञात चालक मालकाविरुद्ध कलम 465 भादंवी, सहकलम 65 (अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्रातील पुढील तपास पोउपनि. मानकर करीत आहेत.  

                             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR IN CHIEF) ‌‌                                     


                             

                                                     

Post a Comment

0 Comments