Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलीस दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील पोमके गट्टा (जां.) येथे साजरा केला रक्षाबंधन. P10NEWS

. मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

गडचिरोली पोलीस दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील पोमके गट्टा (जां.) येथे साजरा केला रक्षाबंधन

 महिला पोलीस अंमलदार व शालेय विद्यार्थींनीनी घेतला सहभाग.

सी-60 च्या जवानांनी फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या विद्यार्थीनींनकडुन राखी बांधुन घेत रक्षाबंधन साजरा केला.

      गडचिरोली/ दिनांक :-(30) -  गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग म्हणुन ओळखले जाणा­या उपविभाग हेडरी अंतर्गत येणा­या पोलीस मदत केंद्र गट्टा (जां) येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी पोलीस महिला अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी पोमकें गट्टा (जां.) येथे भेट देवुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पोमकें गट्टा (जां.) येथील महिला पोलीस अंमलदार व जिल्हा परिषद डिजीटल शाळा, जाजावंडी येथील विद्यार्थींनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेवुन सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधली. 


यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी शुभेच्छा देतांना सांगीतले की, “गडचिरोली पोलीस दलात दुर्गम भागात पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर महिला पोलीस अंमलदार या पोस्टे सुरक्षा, माओवादी विरोधी अभियानामध्ये अग्रभागी आहेत. अनेकवेळा कर्तव्यामुळे हा सण त्यांना पोस्टेवरतीच साजरा करावा लागतो. त्यांना कुटुंबात सहभागी होता येत नाही. कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणा-या या महिला पोलीस अंमलदारांसोबत हा रक्षाबंधनाचा सण आज आम्हास साजरा करता आला”. तसेच उपस्थित सर्वाना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. 

यासोबतच खडतर सेवा देणारे सी-60 चे जवान अतिसंवेदनशील भागात सेवा देत असतांना आपल्या कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन सण साजरा करु शकत नाहीत. त्यामुळे सी-60 च्या अधिकारी व अंमलदार यांना फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या विद्यार्थीनी व प्राध्यापिका वनमाला माळी यांनी विशेष अभियान पथक कार्यालय, गडचिरोली येथे राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला.

या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक  श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांचे सह सिआरपीएफचे असिस्टंट कमांडन्ट मोहित कुमार, पोमकें गट्टा (जां.) प्रभारी अधिकारी चेतन परदेशी, जिल्हा परिषद डिजीटल शाळा जाजावंडीचे मुख्याध्यापक श्री. बेडके सर तसेच ईतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                        ( EDITOR IN CHIEF)

               


Post a Comment

0 Comments