Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली शहर बनले जनावरांचे कुरण . नगरपालिका प्रशासन व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. P10NEWS

 

  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

गडचिरोली शहर बनले जनावरांचे कुरण .              नगरपालिका प्रशासन व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

गडचिरोली : शहराच्या मुख्य चौकातून धानोरा, मूल व चामोर्शीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यावर रस्ता दुभाजक तयार करण्यात आले असून त्यावर सध्या गवत वाढले आहे. या गवतावर शहरातील मोकाट जनावरांनी बस्तान मांडले असून रस्ता दुभाजक जणू काही जनावरांसाठी कुरण तयार झाले आहे. या जनावरांमुळे सदर रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. तरीही मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे नगरपालिका प्रशासन व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी केला आहे.


          सध्या पावसाळ्याचे दिवस असून रस्ता दुभाजकावर गवत वाढले आहे. या गवतावर शहरातील मोकाट जनावर दिवसभर चरण असताना दिसून येतात. यासोबतच चामोर्शी व मूल रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. चामोर्शी रस्त्यावर यापुर्वीही जनावरांमुळे लहान मोठे अपघात झाले आहेत. तरीही पालिका व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रस्त्या दुभाजकावर चरणाऱ्या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही मोटघरे यांनी केली आहे.

                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       ( EDITOR IN CHIEF) 

                


Post a Comment

0 Comments