मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
गडचिरोली/ दिनांक-19 :- गडचिरोली सिमा क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, विद्यालये बंद करणेबाबत. जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, वॉडिया, पर्लकोटा , पामुलगौतम, इंद्रावती नद्दांचा पाण्याची पातळी सुद्धा वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्दा व नाल्यांना पुर आल्याने जिल्ह्यातील अंतर्गत मार्ग बंद होत असतात . भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय नागपूर द्वारा आज 19/07/2023 ला गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आलेला असुन वज्राघाटासह मुसळधार व अती मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. यामुळे दिनांक 19/07/2023 ला मा. संजय मिना जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत पुरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत दिनांक 20/07/2023 ला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, विद्यालये बंद असतील. सदरचे आदेश केवळ शाळा महाविद्यालय अंगणवाडी विद्यालये करिता लागु असुन इतर सर्व कार्यालये, दुकान , आस्थापना इत्यादींना सदरचे आदेश लागू नाही. सदरचे आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी व्यक्ती , संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदर आदेश जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी केले आहे.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. (EDITOR IN CHIEF).
0 Comments