Header Ads Widget

Responsive Advertisement

राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचा दौऱ्यामुळे कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट मार्ग दिनांक 05 जुलै ला रहदारीसाठी बंद P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
                                                     

   कोटगल टी-पॉईंटते कोर्ट टी-पॉईंट मार्ग दिनांक 05 जुलै ला रहदारीसाठी बंद.

गडचिरोली/०२:-(जिल्हा प्रतिनिधी- नंदलाल कन्नाके) :-गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, दिनांक 05 जुलै 2023 वार बुधवार रोजी महामहीम राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा नियोजित आहे.  तरी दिनांक 05 जुलै रोजी होणा­या दौ­याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट दरम्यानचा मार्ग दिनांक 05 जुलै वेळ सकाळी 05.00 वा. ते सायंकाळी 05.00 वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये.

महामहीम राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणा­या गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमासाठी येणा­या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय टी-पॉईंट  येथील खुल्या मैदानात केली असून, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हि.व्हि.आय.पी.) वाहनांची सोय मृदा संवर्धन कार्यालय, या ठिकाणी केलेली आहे.  तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

                 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR IN CHIEF).                                          Post a Comment

0 Comments