मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF).
आत्मसमर्पित नक्षल सदस्यांनी चित्रपटासाठी दिली ऑडिशन.
गडचिरोली- दिनांक/२४:- गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असा जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांश आदिवासी बांधव हे दुर्गम -अतिदुर्गम भागात राहात असुन जुन्या रुढी परंपरेने ते वर्षांपासून आपले जिवनमान जगत आले आहेत. त्यामध्ये एक अशी परंपरा आहे की, मासिक पाळीच्या दिवसात या भागातील महिलांना घराच्या आत न राहता बाहेर एक छोटे घर बनविलेले असते.त्यात राहावे लागते. त्याला कुर्माघर असे म्हणतात. त्यावर आधारित "कुर्माघर" नामक चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याने अगडबम , टुरिस, टॉकिज नमस्कार जयहिंद , तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे अशा अनेक चित्रपटांच्या निमित्त्या तृप्ती भोईर व विशाल कपुर यांनी नक्षलवादांचा कठोर मार्ग सोडून गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या आत्मसमर्पितांच्या नवजिवन वसाहत येथे आज दिनांक:-24/06/2023 रोजी जावुन विविध पुरुष तसेच महीला आत्मसमर्पित सदस्यांचे चित्रपटांच्या निमित्तिसाठी ऑडिशन घेतले . त्यामध्ये त्यांनी त्यांचे आवाजाचे परिक्षण व मार्गदर्शन केले.
भविष्यामध्ये आत्मसमर्पित सदस्यांना चित्रपट सृष्टीत काम करण्याची संधी मिळावी. यादृष्टीने मा. पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल सा. (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पित नक्षल सदस्यांनी चित्रपटात काम करावे. व स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावी. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच
ऑडिशन दरम्यान मा . अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि सागर झाडे व अमंलदार हे उपस्थित होते.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF).
0 Comments