Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत “रोजगार मेळाव्याचे” आयोजन P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या 

माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत “रोजगार मेळाव्याचे” आयोजन

   गडचिरोली / दिनांक- 22:-गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर आणि मेहमुदा शिक्षण बहुद्देशीय संस्था नागपुर व एसआयएस, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22/06/2023 रोजी “रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला. 

या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 200 बेरोजगार युवक-युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते, यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांचे मार्फतीने हॉटेल मॅनेजमेंंट, नर्सिंग असिस्टंट व सुरक्षा रक्षक म्हणुन उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच पुणे व हैद्राबाद येथे नर्सिंग असिस्टंंट प्रशिक्षन पुर्ण केलेल्या 35 युवतींंना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास उपस्थित युवक-युवतींंना मार्गदर्शन करतांना मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांनी सांगीतले की, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील बेरोजगार युवक - युवतींंना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन देण्यात येतात, त्याचा सर्वांंनी फायदा करुन घ्यावा. आपले व आपल्या कुटुंंबीयांचे जीवनमान उंचावावे. तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. यांनी आपले भाषणात सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, मेहनत करुन जास्तीत जास्त यशस्वी व्हावे. गडचिरोली पोलीस दल नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, तुमचे नातलग, मित्र मैत्रीणीना जे बेरोजगार आहेत त्यांना देखील रोजगार बाबत अवगत करावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. 


सदर रोजगार मेळावा मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच श्री. हेमंत बन्सोड, मोबलायझेशन अॅन्ड प्लेसमेंट हेड, पार्कसन्स स्किल इन्स्टीट¬ुट, नागपूर, श्री.  तुषार मेश्राम संस्था प्रमुख, मेहमुदा शिक्षण बहुद्देशीय संस्था नागपुर व श्री. मुकेश पाटणे एसआयएस, चंद्रपुर यांच्या उपस्थितीत पार पडला. 

       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. 


             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       ( EDITOR IN CHIEF)

              


           

Post a Comment

0 Comments