Header Ads Widget

Responsive Advertisement

५ जुलै ला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गडचिरोलीत येणार पण खासदार साहेब रेल्वे कधी येणार, मार्कंडा देवस्थान बांधकाम कधी होणार ! समस्या मार्गी लागणार काय ? P10NEWS

 

   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


५ जुलै ला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गडचिरोलीत येणार 

पण खासदार साहेब रेल्वे कधी येणार, मार्कंडा देवस्थान  बांधकाम कधी होणार !  समस्या मार्गी लागणार काय ? 


    गडचिरोली / 21:-    गडचिरोली जिल्हा हा अनेक समस्यानी ग्रस्त आहे. आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.  रेल्वे , मार्केंडा देवस्थान बांधकाम, सुरजागड प्रकल्पात स्थानिकांना काम , वनजमिनींच्या समस्या, जिल्हा परिषद शाळांचा खालावत चाललेला शैक्षणिक दर्जा, असा प्रकारे  अनेक समस्या जिल्ह्यासमोर आव मांडुन बसलेल्या आहेत.  खासदार साहेब  राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या माध्यमातून सुटतील काय ? की पुन्हा राष्ट्रपती यांच्या दौऱ्यामुळे फुटपाथ वरिल बेरोजगारांच्या रोजगारावर जेसीबी प्रशासनाकडून चालवुन युवकांना बेरोजगार करण्याच्या कामा पलीकडे दुसर कोणतेचं काम होणार नाही. याकडे सर्व आदिवासी जिल्हा वासियांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा दौऱ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहेत. आदिवासी जिल्हा म्हणून त्यांच्या भावना आपल्याला जिल्ह्याबद्दल भाषणातून व्यक्त होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याला त्यांच्याकडुन कोणती मोठी भेट स्वरुपात प्राप्त होईल.  याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचा व राजकीय नेत्यांचा लक्ष असणार आहे.                                                   गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आगमणा निमित्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा आदिवासी जिल्हा गडचिरोली वासियांतर्फे जोरदार स्वागत आहे.  आणि कुतुहलता सुध्दा आहे.                                           

         गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शिलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी खासदार अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे दि.१० मे २०२३ रोजी भेट घेत मागणी केली होती. त्यावेळी सोबत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.

त्याच अनुषंगाने खासदार अशोक नेते यांच्या मागणीनुसार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हया ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार अशी माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दिली.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत,अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच कदाचित घटना असेल याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी केले.

            

         

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          EDITOR IN CHIEF  Post a Comment

0 Comments