Header Ads Widget

Responsive Advertisement

धोडराज येथील श्री. लालसु डोलु ओक्सा यांना निवासाकरिता घर बांधकाम व राशन, जिवनावश्यक वस्तू ,शेती उपयोगी साहित्य देऊन पोलिसांनी गरजुस दिला आधार. (ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.) P10NEWS

.    मंंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


 पोमके धोडराज पोलिसांनी दिला मदतीचा हात.                      

गडचिरोली ( पोमके धोडराज पोलिस) /:-  गडचिरोली पोलिस दल "पोलिस दादालोरा खिडकी" च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचे मनोगत वाढविण्याकरिता तसेच आपल्या कर्तव्यासोबतचं सामाजिक कार्याची जाण ठेवून जनसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलिस दल सदैव तत्पर असुन गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील जनते पर्यंत विविध शासकीय योजना पोहचविण्याकरिता मा. पोलिस अधीक्षक सा. यांच्या संकल्पनेतून राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे जिवनमान सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. व नागरिकांचे नाते अधिक दृढ होण्याच्या उद्देशाने पोमके धोडराज यांनी मौजा कुरचेर येथील नामे श्री. लालसु डोलु ओक्या , वय 65 वर्षे यांचे राहते घर अचानकपणे लागलेल्या आगीमुळे पुर्णतः जळुन खाक झाले.


त्यात त्यांचे दैनंदिन लागणारे आवश्यक राशन व जिवनावश्यक वस्तू तसेच शेती उपयोगी साहित्य व ईतर साहित्य जळाले असल्याने त्यांचा निवासाचा व उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर इसम हा निराधार व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे निवा-याची साधन उपलब्ध करु शकत नसल्याबाबतची माहिती मौजा कुरचेर च्या ग्रामस्थांनी दिनांक 15/04/2023 च्या ग्रामभेटीत पोउपनि सुर्यवंशी सा. यांनी दिली पोमके धोडराज येथील प्रभारी अधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर सदर व्यक्तीला एक मदतीचा हात म्हणून पोमके धोडराज मधील सर्व अधिकारी व अमंलदारांना माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन केल्याने सर्व पोलिस अधिकारी व अमंलदार यांनी श्री. लालसु डोलु ओक्सा यांना निवासाकरिता घराचे नवीन बांधकाम तयार करून देण्यासाठी मदत केली. तसेच त्यांना दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या आवश्यक राशन , जिवनावश्यक वस्तूंचे व शेती उपयोगी साहित्यांचे काल दिनांक 05/05/2023 रोजी मा. पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल सा., मा. अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री ‌ अनुज तारे सा. , मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री यतिश देशमुख सा., तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नितीन गणापुरे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोमके धोडराज येथील सर्व पोलिस अधिकारी / अमंलदार साहित्य वाटप केले.        पोमके धोडराज येथील प्रभारी अधिकारी पोउपनि गुरव सा. व त्यांच्या टिमच्या नाविन्यपूर्ण कामाचे गावकऱ्यांनी प्रशंसा केली.

                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                           EDITOR IN CHIEF.                                                   


Post a Comment

0 Comments