Header Ads Widget

Responsive Advertisement

मेडीगड्डा प्रकल्प पिडीत शेतकऱ्यांचा उपोषणाला भेट देऊन समस्यांवर केली चर्चा - मा. खासदार अशोक नेते


      

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक  (EDITOR IN CHIEF)


       मेडीगड्डा प्रकल्प पिडीत शेतकऱ्यांच्या साखळी उपोषण व   धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासंबंधी खासदार अशोक नेते यांनी उपोषणकर्त्यांन सोबत केली चर्चा

 दि. ०५ मे. २०२३

सिरोंचा - असरअल्ली रस्त्याची समस्या त्वरित सोडवा...

मेडीगड्डा प्रकल्प पिडीत शेतकऱ्यांची खासदार अशोक नेते यांच्याकडे मागणी. 


सिरोंचा :-   स्थानिक तहसील कार्यालयासमोर मागील दहा दिवसांपासून मेडिगड्डा प्रकल्प पिडीत शेतकऱ्यांचे साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. यादरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खा. अशोक नेते यांनी भेट दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सिरोंचा - असरअल्ली रस्त्याची समस्या मांडून सोडविण्याची मागणी केली. खा. अशोक नेते यांनी लगेच जिल्हाधिकारी संजयजी मिना व  वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याच्या बांधकामाला गती देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाला गती मिळेल, असा विश्वास खा. अशोक नेते यांनी उपोषणकर्त्यांना दिला.

तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून छत्तीसगड राज्यात जाणारा राष्ट्रीय महामार्ग ६३ गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका मुख्यालयातून जाते. दोन दशकांपूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग १६ म्हणून ओळखला जात होता. आता हाच महामार्ग ६३ म्हणून ओळखले जात आहे. या रस्त्याचे बांधकाम दोन दशकांपूर्वी सीमा सडक संघटनेने (बि.आर. ओ.) केले होते. तेव्हापासून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. असे असले तरी मागील काही वर्षांपासून या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक होत आहे. यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील काही दिवसांपासून या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणी समोर करून काम थांबविण्यात आल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी खा. अशोक नेते यांच्याकडे केली. 


उपोषणकर्त्यांची ही समस्या लक्षात घेऊन खा. अशोक नेते यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधून सदर प्रभावित झालेल्या काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे असरअल्ली - सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग ६३ चे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खा. अशोक नेते यांनी उपोषणकर्त्यांना दिला. यावेळी उपोषणकर्ते म्हणून सुरज दुदी, रामप्रसाद रंगुवार, तिरुपती मुद्दाम, विशाल रंगुवार, श्रीनिवास रंगुवार आदींसह भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अेरिगेलवार,जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकंपलीवार,तालुकाध्यक्ष शंकर नरहरी,तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, इंजिनिअर नितिन बोबळे, इंजिनीअर सांरग गोगटे,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत शुगरवार, युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष राजेश संतोषवार, ता.महामंत्री माधव कासरलावार, जिल्हा सचिव संदिप राचरलावार,मन कि बात संयोजक तथा जि. उपाध्यक्ष सतिश पाळमटेंनटी,शहराध्यक्ष सितापती गटटु,ओबिसी आघाडी.ता.अध्यक्ष रमेश मुंगीवार,ओबिसी आघाडी उपाध्यक्ष नागेश ताडबोईना,

तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

                 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                         EDITOR IN CHIEF

                  Post a Comment

0 Comments