Header Ads Widget

Responsive Advertisement

12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र करिता त्रुटींची दुरुस्ती करण्याची सूचना. P10NEWS

 

  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF


   12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र करिता त्रुटींची दुरुस्ती करण्याची सूचना.


गडचिरोली / दि.18: सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 11वी, 12 वी विज्ञान शाखेतील तसेच सेवा व निवणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक त्या दस्ताऐवजासह समितीस दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत दाखल केले अशी प्रकरणे निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. तरी ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ईमेल. आय. डी. वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही, अशी सर्व प्रकरणे त्रृटीत असल्याने अर्जदारानी कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे. 

इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील तसेच सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेणे चालू आहे, तरी सर्व अर्जदारांनी कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन उपायुक्त  तथा सदस्य  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली, देवसूदन  धारगावे यांनी केले आहे.

                      मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक                                            EDITOR IN CHIEF      

                   


  
          

Post a Comment

0 Comments