Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलिस दल आयोजित पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून "गडचिरोली महोत्सव ". गडचिरोली जिल्ह्यातील हस्तकलेला ई- मार्केट उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. P10NEWS

.   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


 गडचिरोली पोलिस दल आयोजित पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून "गडचिरोली महोत्सव ".

 * विजेत्या संघाचा मान्यवरांकडून सत्कार                         * व्हालिबॉल स्पर्धेत गडचिरोली तर रेला स्पर्धेत                      चामोर्शीच्या संघाने पटकाविला प्रथम क्रमांकावरचे             बक्षीस.                                                                   *बचत गट व स्वयंसहाय्यत गटांना मिळाली भव्य                 बाजारपेठ , विविध स्टाॅलवरुन २४ लाखांच्यावर                वस्तुंची विक्री.         

    गडचिरोली/०५:- गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा  खिडकीच्या माध्यमातून 'गडचिरोली महोत्सवाचे ' आयोजन करण्यात आले.हा महोत्सव  जिल्हा परिषदेच्या भव्य  मैदानावर दिंनाक 03/03/2023 ते  04/03/2023 दरम्यान पार पडला. गडचिरोली पोलिस दलाने आयोजित केलेल्या व दोन दिवसांपासून चाललेल्या या गडचिरोली महोत्सवाचे विशेष आकर्षण बिरसा मुंडा व्हालिबॉल स्पर्धा व आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा तसेच हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे समारोपीय सोहळा दिनांक 04/03/2823 रोजी मा. अप्पर पोलीस महासंचालक , (वि. कृ.) म. रा. मुंबई  श्री. प्रविण सांळुखे सा. यांच्या हस्ते मा. पोलिस उपमहानिरीक्षक श्री. संदीप पाटील सा. गडचिरोली परिक्षेत्र नागपूर यांच्या हस्ते उपस्थित पार पडला.यावूळी मान्यवरांच्या हस्ते. गडचिरोली पोलिस दलांकडून नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या प्रोजेक्ट उडाण व प्रोजेक्ट उत्थानच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.प्रोजेक्त उडाण सर्वकक्ष सक्षमीकरण अंतर्गत युवकांना रोजगार, कला, साहित्य व खेळ यामध्ये संधी प्राप्त करून देण्याचा उद्देश आहे. तसेच प्रोजेक्ट उत्थान सर्वांगीण विकासचा अभिनव उपक्रम या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हस्तकलेला ई- मार्केट उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. गडचिरोली पोलिस व indocrofti.com या इमेल मार्केट कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. 


महोत्सवातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील व्हॉलिबॉलचे १० संघ उपस्थित होते. या संघामध्ये अत्यंत रोमहर्षक सामने पहावयास मिळाले.या व्हॉलीबॉल स्पर्धेतून ०३ विजेत्या संघांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेते गडचिरोली येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र  या संघास २५०००/- हजार रुपये रोख, ट्राफी, व गोल्ड मेडल , द्वितीय क्रमांकाचे विजेते महेश व्हॉलीबॉल संघ , मुकडीगुटा यांना २००००/- रु. रोख , ट्राफी सिल्व्हर मेडल, व तृतीय क्रमांकाचे विजेते आरडी क्लब व्हॉलीबॉल संघ , अहेरी यांना १५०००/- रु रोख, ट्राफी व ब्रांझ मेडल देऊन सत्कार करण्यात आले.तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट आॉलरांउडर म्हणून कामगिरी करणाऱ्या चैतन्य अशोक भसारकर उत्कृष्ट स्मॅशर म्हणून तरुण रंगवलु गावडे,  उत्कृष्ट लिफटर म्हणून फिरोज नामदेव बारसिंगे यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिंनाक ०४/०३/२०२३ रोजी आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा पार पडल्या‌. त्यातून आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन  उपस्थितांना पहावयास मिळाले. या रेला नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातुन दहा संघ सहभागी झाले होते. त्यापैकी उत्कृष्ट पहिल्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.  प्रथम विजेत्या डि. वायरस गृप चामोर्शी गडचिरोली यास २५०००/- रु. रोख, ट्राफी व प्रमाणपत्र,   द्वितीय क्रमांकाच्या युवा यंग रेला नृत्यसंघ , मरपल्ली, (भामरागड) यास २००००/-. रोख , ट्राफी व प्रमाणपत्र , आदिवासी रेला नृत्य संघ, कोंदावाही (पेंढरी), यास १५०००/- रु रोख, ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातुन आलेल्या आदिवासी पारंपरिक रेला नृत्यासोबतचं स्थानिक कलावंतांनी विविध नृत्य सादर करून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.  महोत्सवातील दोन्ही दिवस गडचिरोली जिल्ह्यातील विविध ९० बचत गट व संस्थानी आपल्या उत्पादनांचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये नवजीवन उत्पादक संघ, नवेगाव गडचिरोली , कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली , पोष्ट ऑफिस, कृषी विभाग, इतर शासकीय कार्यालया सोबतचं मौजा किटाळी, वासाळा,पुराडा, कोटमी, भामरागड, अहेरी येथुन बांबू, माती व लाकडापासून बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू , ऑर्गनिक उत्पादने तांदूळ, हळद, पालेभाज्या, अंबाडी सरबत मोहफुलापासुन तयार केलेले लाडु, बिस्किट, जाम,मस्य लोणचे, जांभुळ निर्मित विविध उत्पादने तसेच इतर वस्तू विक्रिकरिता लावण्यात आले होते.

 बचत गट व स्वयंसहाय्यत गटांच्या विविध हस्तकलेच्या वस्तुंच्या स्टाॅलमधुन दोन दिवसात २४ लाखांच्यावर उलाढाल झाली. या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गट व संस्थांना मोठी बाजारपेठ मिळाली.या महोत्सवातील बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमात मा. अप्पर पोलीस महासंचालक (वि.कृ.) , श्री. प्रविण सांळुखे सा. मा. पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल सा. मा. जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. संजय मिणा सा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली श्री. कुमार आर्शिवाद सा. मा. अप्पर पोलीस अधीक्षक ( अभियान) श्री. अनुज तारे सा. मा‌ अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. मा अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा.  मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी गडचिरोली श्री.  मैनक घोष सा. सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी , गडचिरोली हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी , पोस्टे/उपपोष्टे / पोमकेंचे अधिकारी व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. श्री. धनंजय पाटील अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                                EDITOR IN CHIEF.                                                     


Post a Comment

0 Comments