Header Ads Widget

Responsive Advertisement

जागतिक जलदिनी जलजागृती सप्ताहाचा समारोप. P10NEWS

 

   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

जागतिक जलदिनी जलजागृती सप्ताहाचा समारोप.


गडचिरोली, दि.२२:  जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पाटबंधारे विभागाचे वतीने दिनांक 22 मार्च 2023 ला "जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रम" जलसंपदा विभाग सोनापुर कॉम्प्लेक्स परिसरात संपन्न झाला .या कार्यक्रम प्रसंगी  जलदेवतेचे पूजन करून व जलदेवतेच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी जल प्रतिज्ञा घेऊन जलसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार यावेळी केला .


मराठी नव वर्ष व जागतिक जल दिनाचे निमित्ताने या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविकमधून उप विभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी जल महत्व विशद केले.  30 नोव्हेंबर 2016 चे शासन परिपत्रकाप्रमाणे या कार्यक्रमाची प्रासंगीकता त्यांनी प्रास्ताविकातून विशद केली. तसेच या जलजागृती सप्ताहाच्या दरम्यान सर्वांनी पाण्याची बचत आणि पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचं आणि भविष्यातील पाण्याच संकट थांबविण्याच आवाहन उपस्थितांना केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले मार्गदर्शक जलप्रेमी मनोहर हेपट  यांनी या समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मागील 7 वर्षातील आपल्या कार्याकडे अंतर्मुख होऊन बघण्याच आवाहन केलं ,एवढेच नव्हे तर या पुढील काळात आपण सर्वांनी संवेदनशील होऊन पाण्याचे महात्म्य जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना पटवून द्याव असेही आवाहन केले. प्रामुख्याने वातावरणातील बदल, प्रकृतीच निसर्गाच शोषण, समाजामध्ये वाढलेली  हिंसा आणि पृथ्वीला आलेला ताप तसेच मानवाचा चंगळवाद यावर चिंतन मनन करण्याची आवश्यकता असून महात्मा गांधींच्या विचाराची व गाव स्वावलंबी  होऊन  तेथील जनसमुदायमध्ये  जनजागृती ग्रामसभा, शाळा, महाविद्यालय यांचे माध्यमातून करण्याचा निर्धार व संकल्प आजचे मराठी नववर्षाचे दिनी आणि जागतिक जलदिनाचे निमित्ताने उपस्थितना आवाहन केले. चला जाणूया नदीला आणि चला जाणूया वनाला या दोन्ही संकल्पनेला घेऊन आपण भविष्यात काम करूया असा विश्वास त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला .

या कार्यक्रम प्रसंगी कुमारी तुमराम, गणेश कोरे, बोधलकर, विकास दुधबावरे, स्नेहल इंगुलवार, बाळकृष्ण पंधरे, कार्तिक ढवळे, रुपेश अलाम, किशोर कोडापे, रितेश झापे, भूषण नैताम,  सुरेश राठोड, अत्राम, प्रमुख उपस्थितीत होते. करण गौर, अंकित किरणापुरे, साई गेडाम, अथर्व परदेशी, कु.वीरा परदेशी व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक भांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन कुमारी तुमराम यांनी व्यक्त केले.

                            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                             (EDITOR IN CHIEF).                                   


Post a Comment

0 Comments