Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्रसंचालकाच्या व्हायरल व्हिडिओ बाबत इयत्ता 10 वी 12 वी च्या परीक्षा संबंधाने सदर गैरप्रकाराची तक्रार प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाणे कुरखेडा या ठिकाणी नोंदविण्यात आली . P10NEWS

. मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


     केंद्रसंचालकाच्या व्हिडिओ बाबत निवेदन.

गडचिरोली, दि.०९ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) फेब्रुवारी, मार्च 2023 परीक्षा केंद्र 627 केंद्र संचालकाबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओ व त्या अनुषंगाणे शिक्षण विभाग (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे कडुन निवेदन देण्यात येत आहे कि, सदर बाबीचे गांभीर्य विचारात घेवून गटशिक्षणाधिकारी तथा तालुका परीरक्षक सी. ए. पुराणिक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. सदर चौकशीच्या अहवाल व सचिव, विभागीय मंडळ नागपुर यांनी केलेल्या सूचनेनुसार तात्काळ किशोर अंबरदास कोल्हे यांचे केंद्रसंचालक पदावरून पदमुक्त केले असून त्यांचे ऐवजी कालीदास पुंडलीक सोरते (उच्च माध्यमिक शिक्षक) यांची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून करण्यात आली आहे. तसेच सदर गैरप्रकाराची तक्रार प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाणे कुरखेडा या ठिकाणी नोंदविण्यात आली आहे.     


                         तसेच सदरच्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करणेबाबत विभागीय सचिव यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आदेश दिले आहेत. इयत्ता 10 वी 12 वी च्या परीक्षा संबंधाने कोणताही गैरप्रकार झाल्यास दोषी विरुध्द नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल असे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा सदस्य सचिव जिल्हा दक्षता समिती गडचिरोली आर. पी. निकम यांनी दिले आहे.

                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR IN CHIEF).                               


Post a Comment

0 Comments