Header Ads Widget

Responsive Advertisement

कमलापूर हत्ती कॅम्पमधील नवजात पिल्लाच्या मृत्यूबाबत, शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ठ होईल - उपवनसरंक्षक P10NEWS

 

    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

कमलापूर हत्ती कॅम्पमधील नवजात पिल्लाच्या मृत्यूबाबत.

शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ठ होईल - उपवनसरंक्षक.


गडचिरोली/दि.28: सिरोंचा वनविभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प येथे 8 हत्ती यात 2 नर व 6 मादांचा समावेश आहे. त्यामध्ये मंगला नामक 32 वर्षीय हत्तीण हिची गर्भधारणा झाली होती. जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान प्रसुती होईल असा अंदाज होता. त्याप्रमाणे दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी जंगलात प्रसुती झाली, परंतु नवजात पिल्लु मृतावस्थेत आढळले. त्याची दखल घेऊन मृत पिल्लाच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले व प्रयोगशाळेत चाचणी करीता पाठविण्यासाठी नमूने गोळा करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर नवजात पिल्लाचे मृत्यु कशामुळे झाले याची माहिती मिळू शकेल. प्रसुती नंतर मंगला नामक हत्तीणचे प्रकृती चांगली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी व मुलचेराचे पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन केले आहे असे उपवनसरंक्षक सिरोंचा वनविभाग, सिरोंचा पूनम पाटे यांनी कळविले आहे.

                             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                            EDITOR IN CHIEF 

                                    


Post a Comment

0 Comments