मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
निष्काम कर्मयोगी श्री. राम उर्फ रामभाऊ गुंडीले यांचा सेवा सन्मान समारोह महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे आयोजित.
(शब्दांकन: डॉ. चंदन एम. जोगे)
मानद डॉक्टरेट मुंबई गडचिरोली
लातूर जिल्ह्य हा पाण्याने समस्याग्रस्त व उत्कृष्ट शिक्षणामध्ये जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. परंतु या जिल्ह्यातील काही सामाजिक व राजकीय लोकांनी आपले नाव देशात पोहोचले आहे. असेच लातूर जिल्ह्यातील व अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी येथील
श्री. राम उर्फ रामभाऊ गुंडीले माजी आमदार तसेच अण्णा भाऊ साठे महामंडळचे निर्माते व चेअरमन यांचे बद्दल सांगता येईल. श्री. राम उर्फ रामभाऊ गुंडीले यांचे प्राथमिक शिक्षण स्वगावी टेंभुर्णी येथे झाले. पुढील विद्यालय व महाविद्यालय शिक्षण तालुक्याचे ठिकाण अहमदपूर येथे झाले. व त्यापुढील एल एल बी चे शिक्षण दयानंद ला कॉलेज लातूर येथे झाले. त्यांचे आई व वडील यांचे कडून गोर गरीब लोकांची सेवा करण्याचे बाळकडू लहान पणा पासूनच मिळाले. त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असल्याने अहमदपूर येथे सन 1971 मध्ये महात्मा गांधी विद्यालयामध्ये लॅब असिस्टंट ची नौकरी मिळाली. त्यांच कमवा, शिका व सेवा करा हे कार्य करीत होते. नोकरी मध्ये मन रमले नाही व लोकांची सेवा करण्याची आवड त्यांना होती म्हणूनच त्यांनी अगदी दहा वर्षांमध्येच नोकरी चा राजीनामा दिला. सन 1984 पासून गोर गरीबांसाठी सामाजिक सेवा करताना विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चे, व सभा गाजवून महाराष्ट्रभर परिचित झालेत. त्याचाच एक भाग म्हणून 1984 मध्ये चंद्रपूर येथे 1200 पोतराजांचे डोकं भादरलेत व त्यांच्या मुलाबाळांना मुख्य प्रवाहात आणलेत त्यामुळे आज त्यांचे मुले शासकीय नोकरीमध्ये कार्यरत आहेत. त्यावेळेस त्यांच्यावर प्राण घातला हल्ला सुद्धा करण्यात आला. परंतु न घाबरता आपले काम चालूच ठेवले. त्यामुळे ते नावलौकिकाला आले. 1971 ला साहेबांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पहिली जयंती अहमदपूर येथे साजरी केली तेव्हापासूनच जयंतीला सुरुवात झाली. व मागील सन 2009 पासून दिल्ली येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती सतत साजरी करतात. सोबत त्यांनी महाराष्ट्र मध्ये रेशन कार्ड चे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, निराधारांचे प्रश्न, भूमिहीन शेतमजुरांच्या अडचणी पडित जमिनीचे प्रश्न, बेरोजगारांच्या च्या नोकरीचा प्रश्न, आणि वनहक्क जमिनीचे प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविला. त्यामुळे त्यांना सहाजिकच राजकारणाचे (धडे) बाळकडू मिळू लागले. दिवसें दिवस त्यांची राजकारणातील आवड वाढू लागल्याने त्यांनी लोकाग्रहास्तव हेर या राखीव विधानसभा मतदार संघातून 1995 मध्ये आमदारकीची निवडणुकी करिता उभे झालेत व बहुसंख्य मताने निवडून आलेत. त्यात 23 पैकी 22 लोकांची अनामत रक्कम जप्त झाली त्यात चार आमदार 2 माजी 2 आजी विरोधात उभे होते. यांच्या कार्याचा धडाका बघून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे चेअरमन पदी नियुक्ती केली. त्या वेळेस त्यांनी 500 कोटीची निधी गोरगरिबांना वितरित केली. व त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली. त्याच कालावधीत मुख्यमंत्री साहेबांनी लाखो लोकांच्या उपस्थितीत सहकारी साखर कारखाना तोंडार तालुका उदगीर जिल्हा लातूर हा आमदार साहेबांना बक्षीस दिला. त्यामुळे साहजिकच त्यांचा मुंबई येथे संपर्क वाढला. राज्यातून आलेल्या लोकांची कामे करणे, संबंधित खात्याचे अधिकारी, मंत्र्यांना भेटून जनतेची कामे करणे इत्यादी कामामुळे रामभाऊ गुंडीले यांचा मंत्रालयाचे अधिकारी /कर्मचारी तसेच आमदार व मंत्र्यां सोबत जवळीकता निर्माण झाली.
मागील 38 वर्षापासून भूमी हक्क परिषदे अंतर्गत लोकांना शासकीय गायरान जमिनी लढा लढला व ते जमिनी त्यांचे त्यांच्या नावावर करण्या संदर्भात लढा केला त्यात ते यशस्वी झाले. यावर्षी महाराष्ट्र सरकारने गोरगरीब, अनाथ, अपंग लोकांना शासकीय गायरान जमीन वाटप करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. व 1 डिसेंबर 2022 ला तथ्यसंबंधी जीआर काढला. आदरणीय साहेबांची यशस्वीतेची वाटचाल चालू आहे.
तसेच शासकीय गायरान जमिन व वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीचा राज्यातील पहिला प्रस्ताव आजिवली उत्सव ट्रस्ट मावळ जिल्हा पुणे यांचा शासनाला सादर केला. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट काम लक्षात घेऊन BJP नी 2018 ला मध्य प्रदेशची शेड्युल संभाग प्रभारी म्हणून नियुक्ती केली. याच बरोबर त्यांना उत्कृष्ट लेखनाची सुद्धा आवड आहे त्यांचा बुलडोझर नावाचा कवितासंग्रह काही दिवसांमध्ये प्रकाशित होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने त्यांनी माहूरला श्री दत्तगुरु देवल ऋषी महातीर्थ क्षेत्र पर्यटन स्थळ शासनाकडे सादर केला. हत्ती भेट पर्यटन स्थळ निर्मितीचे जनक, आंतरभारती शिक्षण व संशोधन मंडळ चे राष्ट्रीय सल्लागार रामभाऊ गुंडिले साहेब.
सगळ्यांना सांभाळणारा जीवाला जीव देणारा माणूस, माणुसकी असणारा निकरता तारा, कळत नकळत मदत करणारे, प्रथेच्या विरुद्ध जाणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणणारे व त्यांच्याकडे आलेल्यांना प्रत्येकांना मदत करण्याची भावना व त्यांच्या प्रश्न सोडविणाऱ्या अतिशय कर्तबगार व्यक्ती म्हणून गुंडीले साहेबांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पाच पायलेट लावलेत. हजारो बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती करून देण्यास मदत केली.
अशा कार्यकुशल रामभाऊ गुंडिले यांचा नुकताच 1 फरवरी हा वाढदिवस. यांनी आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र निवडले असून महाराष्ट्रातील लोक समस्या व राजकारणाबद्दल आस्थेने माहिती ठेवतात. राजकीय क्षेत्रातील अचूक गणित जोडतात त्यामुळे त्यांना त्यांचा मित्रपरिवार हे सर्व राजकारणाचे चाणक्य समजतात. त्यांची उच्च पदावर नियुक्ती होवो. व त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांच्या 72 व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
👉शुभेच्छुक दलीत मित्र अड. बी. आर. कलवले नांदेड, श्री. चोले पाटील दादा नागपूर, श्री. राजु पटले पर्यटन भूषण यवतमाळ, श्री. उमाजी बीसेन महाराष्ट्र पर्यटन तज्ञ भंडारा, अड. आनंद गुंडिले लातूर, श्री. सुरेश गुर्वे गोंदिया, श्री. किरण गाडे नाशिक, श्री. हर्षद पाटणकर नाशिक, श्री. दीनानाथ साळुंखे लातूर, श्री. आनंद इंगळे मुंबई, श्री. भास्कर लटके उस्मानाबाद, श्री. बाळासाहेब राजपंगे लातूर, श्री. इक्रार शेख सोलापूर 🤝.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF
0 Comments