Header Ads Widget

Responsive Advertisement

देहरादून येथील भारतीय वन सेवेचे प्रशिक्षणार्थी अधिकारी, IFS (P)2022-24 COURSE 54 RR बॅच चे 100 भारतीय वन सेवेचे प्रशिक्षणार्थी अधिकारी व तामिळनाडू वन अकादमी कोईमतूर येथील 44 प्रशिक्षणार्थी आलापल्लीत.दिनांक 2 फरवरी ते 5 फरवरी या कालावधीमध्ये भेट दिली. P10NEWS

  

     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

      देहरादून येथील भारतीय वन सेवेचे प्रशिक्षणार्थी अधिकारी आलापल्लीत

          गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली वनविभागा अंतर्गत सुरू असलेल्या विविध वाणिकी कामांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी देहरादून येथील IFS (P)2022-24 COURSE 54 RR बॅच चे 100 भारतीय वन सेवेचे प्रशिक्षणार्थी अधिकारी व तामिळनाडू वन अकादमी कोईमतूर येथील 44 प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी दिनांक 2 फरवरी ते 5 फरवरी या कालावधीमध्ये भेट दिली.


        सदर प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना सर्वप्रथम गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांनी पावर पाँइंट प्रेझेंटेशन द्वारे गडचिरोली वनवृत्ता अंतर्गत होणारे वाणिका कामे, विविध उपक्रमे, वनपर्यटनाची कामे, मनुष्य रोजगार निर्मिती, मानव- वन्यजीव संघर्ष, महत्वपूर्ण वनस्पती, वनऔषधी,वनहक्क कायदा व त्यांची अंमलबजावणी , कार्यालयीन प्रशासन,आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती दिली. तसेच वनाधिकारी म्हणून वर्तमानातील व भविष्यातील असणाऱ्या आव्हाने व त्या आव्हानांना कसे समोर जायचे आणि या सर्वांना मधुन वन व वन्यजीव यांचा लोकसहभागातून कसा शाश्वत विकास करायचा या बाबत मार्गदर्शन केले.

         त्यांनंतर प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी वनवैभव आलापल्ली हे जागतिक जैवविविधता वारसांनस्थळ मिरकल, 1987 मध्ये कक्ष क्रमांक 76 मध्ये घेण्यात आलेल्या रोपवन साग विरलन काम, सन 2019 च्या पावसाळ्यात कक्ष क्रमांक 66 मध्ये घेण्यात आलेले साग रोपवन काम, कक्ष क्रमांक 08 मधील कुप क्रमांक 06 चे साग निष्कासन काम, मध्यवर्ती रोपवाटिका मधील साग जळ्या तयार काम, रूट ट्रेनर मधील रोपवाटिका काम, शासकीय साॅमील आदी ठिकाणी क्षेत्रीय भेट देली त्याठिकाणी आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी सर्व प्रकारच्या वाणिकी कामांची टप्पा 1 ते टप्पा 3 पर्यंत करण्यात येणारी कामे, निष्कासित वनउपजा चे लाॅगींग, मोजमाप,  वाहतूक,व दस्ताऐवज तयार करणे बाबत, रोपवनपुस्तीका उपचार नकाशा तयार करणे, रोपवाटिका मध्ये बेड तयार करणे , साग बिज लावणे, साॅमील मध्ये साग साईज चे चिरान करणे व झाडाचे वय ठरवण्यात  बाबत माहिती दिली. व प्रशिक्षणार्थी यांच्या सर्व शकांचे निरासन केले. तसेच वनजमीनी वर होणारे अतिक्रमण हे वर्तमान व भविष्यातील सर्वात मोठा आव्हान असून वनसिमा निश्चीत करून त्यांना पिर्लस च्या माध्यमाने संरक्षीत करणे कसे गरजेचे आहे या वर मार्गदर्शन केले. उपविभागीय वनाधिकारी तथा प्रभारी उपवनसंरक्षक भामरागड नितेश दिपाशंकर देवगडे यांनी वनपरिक्षेत्रअधिकारी प्रशिक्षणार्थी यांना साग रोपवाटिका, साग रोपवन, साग विरलन काम, साग कुप निष्कासन कामे, वनउपज तोडकाम व दस्ताऐवज तयार करणे, साॅमील आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कामी प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी प्रदिप बुधनवार व प्रशिक्षणार्थी सहाय्यक वनसंरक्षक रविकांत शिवाजीराव डेंगरे यांनी सहकार्य केले.

        आलापल्ली वनविभागा अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध वाणिकी कामांची माहिती जाणून इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी देहरादून चे भारतीय वन सेवेचे अधिकारी एन.सि.श्रवनन व शिवबाला व कोईमतुर अकादमी च्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिक्षा देवे यांनी समाधान व्यक्त केले. भावी वनाधिकारी यांनी वाणिकि कामांचे संपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्याचा आनंद यावेळी व्यक्त केला.

      सदर अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, क्षेत्र सहाय्यक अनिल झाडे, प्रकाश राजुरकर, पुनम बुद्धावार ,वनरक्षक दामोधर चिव्हाणे, सचिन जांभुळे, देवानंद कचलामी,चंदु सडमेक, लक्ष्मी नाने, हिरा मलगाम, वाहन चालक     राठोड, गणपत ब्रह्मटेके,सचिन डांगरे मजुर बंडू रामगीरकर, विनोद,  श्रीनिवास गंजीवार ,  स्वप्नील गंजीवार यांनी परिश्रम घेतले.

                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                           EDITOR IN CHIEF.            

                         


Post a Comment

0 Comments