Header Ads Widget

Responsive Advertisement

पुणे येथे भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 शासकीय सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न... P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


पुणे येथे भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 शासकीय सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न...


पुणे:- महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती मुंबई, SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चैनल कोल्हापूर, महिला सक्षमीकरण, पोलीस बाईज, मैत्रीण ग्रुप उद्योग, लाईव्ह इन मराठी न्यूज चॅनल नेटवर्क पुणे, गायत्री फाउंडेशन कराड* यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार २०२३ हा शासकीय सोहळा *आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी पुणे* येथे शासकीय  अधिकारी व उच्चपदस्थ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त साधून 15 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र नंतर भारतीय नागरिकांना दीडशे वर्षाच्या ब्रिटिश जुलमी कायदे रद्द करून संविधानाने हक्क व अधिकारामुळे हिंदुस्थानातील प्रजेला सत्ता प्राप्त झाली तो दिवस प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. 73 रा व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधुन ८५ व्यक्तींना भारतीय संविधानाचे महत्त्व व अधिकार बाबत महाराष्ट्रातील विशेष कार्य केलेल्या सामाजिक सेवा क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी,  सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार व सामान्य  व्यक्तींचा भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. बुधवार दिनांक 22- 2- 2023 रोजी सायंकाळी 5.00  वाजता पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी पुणे येथे संसदीय राजकीय व शासकीय अधिकारी यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण मोठ्या दिमाखात झाले. पुरस्काराचे स्वरूप *भारतीय सिंह राजमुद्रा, संविधान उद्देशिका, मानपत्र व मानाचा कोल्हापुरी फेटा* असे स्वरूप होते. या भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत प्राप्त विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीप प्रज्वलनाने शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत भारतीय संविधानाची उद्देशिका व पर्यावरण विषयक झाड देऊन करण्यात आहे. हा सोहळा मोठ्या हर्षउल्लासात व दिमागात  साजरा झाला. या भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार 2023 च्या शासकीय सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. उषाताई वाडेकर उपमहापौर पुणे मनपा, मा. डॉ. बबन जोगदंड विभाग प्रमुख यशदा, पुणे, मा.सौ. सविता शिंदे महिला सक्षमीकरण व पोलीस बाईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मा.डॉ. चंदन जोगे समन्वयक म.रा.प.क.व सा.म.स. मुंबई, मा. श्री. अजिजभाई शेख अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियन वाहतूक आघाडी, मा.डॉ.प्रा. महादेव रोकडे  सहसमन्वयक पुणे, मा. श्री. अमित पालव पत्रकार पुणे, मा.श्री. नारायण रसाळ अध्यक्ष बार असोसिएशन, सौ. अनुराधा गोलिपकर अध्यक्ष मैत्रीण उद्योग ग्रुप हे होते. 

सदर कार्यक्रमाचे सुरुवात ही सामूहिक संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आली. पुरस्कृत्यांचे माहिती व प्रस्तावना ही महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती मुंबई संकल्पना व नियोजन प्रमुख मनोज सोनवणे यांनी केली. मान्यवरांचे सममयोचीत भाषणे झाली व त्या नंतर पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये पुणे विभागातील बहुसंख्येने लोक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा इंगळे यांनी अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने केले. व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

                        मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                           (EDITOR IN CHIEF).                                         


Post a Comment

0 Comments