Header Ads Widget

Responsive Advertisement

भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलास मोठे यश. P10NEWS

   

       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक ( EDITOR IN CHIEF)

     भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलास मोठे यश.                                                             

     गडचिरोली/ दिनांक 15/01/2023 रोजी उपविभाग अहेरी अंतर्गत    येणाऱ्या उपपोष्टे पेरमिली हद्दीतील मौजा वैडमपल्ली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दुपारी 02.00 वाजता दरम्यानची सदर जंगल परिसरात 20 ते 25 अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलिस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. विशेष अभियान पथकांच्या बहादुर जवानांनी प्रतिउतरादाखल व स्वरक्षंणासाठी. नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची कुटील योजना गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांनी हाणुन पाडली. 


                               नक्षल चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता त्यामध्ये 01 भरमार, 01 नग पिस्तूल, 01 नग वॉकीटॉकी , चॉर्जर व इतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. हि संपूर्ण कारवाई मा.  पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री . अनुज तारे सा. मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा.  मा अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा यांचे देखरेखीखाली पार पडली .         

विशेष अभियान पथकांच्या या जवानांच्या शोर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सा.यांनी कौतुक केले असून सदर परिसरात नक्षल अभियान अधिक तिव्र करण्याचे संकेत दिले आहे.    

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                     ( EDITOR IN CHIEF)

                      


Post a Comment

0 Comments