Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्हा कृषी महोत्सवाची सांगता. महोत्सव यशस्वी व फलदायी P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

गडचिरोली जिल्हा कृषी महोत्सवाची सांगता

महोत्सव यशस्वी व फलदायी.

गडचिरोली,दि.16 :  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गडचिरोली जिल्हा कृषी महोत्सव 2022 चे दिनांक 12 ते 16 डिसेंबर पर्यंत थाटात आयोजन करण्यात आलेले होते. आजच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉ.देवरावजी होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोली, आत्माचे प्रकल्प संचालक डॉक्टर संदीप कराळे, श्री वसवडे तंत्र अधिकारी कार्यालय जी क्रु अ गडचिरोली, प्रगतशील शेतकरी श्रीमती प्रतिभाताई चौधरी,


प्रगतशील शेतकरी डॉ.मुनघाटे, प्रगतशील शेतकरी वामनरावजी सावसाकडे, तसेच वनधन ग्रामसभेचे सरपंच आदी उपस्थित होते. आमदार डॉक्टर होळी यांनी कृषी महोत्सव संबंधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संबंधित विविध पैलूंच्या बाबतीत माहिती व तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर मेक इन गडचिरोली ह्या सदराखाली शेतकऱ्यांनी कृषी व कृषी संलग्न व्यवसाय करण्याकरता शेतकऱ्यांना आव्हान केले. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मार्फत देशातील जनतेला विविध योजनां अंतर्गत होत असलेल्या लाभ आणि त्याचे अंमलबजावणी करण्याकरता जनतेला आव्हान केले.


कृषी महोत्सव 2022 च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी महोत्सवात सहभागी सर्व कृषी व कृषी संलग्न विभागांचे स्टॉल्स, शेतकरी गट कंपनी मार्फत आयोजित स्टॉल्स, महिला गट मार्फत अन्नप्रक्रिया व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स कृषी, कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी शेतमाल प्रक्रिया यावर आधारित प्रकाश पारितोषिक प्रदान करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी, महिला शेतकरी यांचा प्रगतिशील शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला. समारोपची सांगता राष्ट्रगीताने झाली. आभार प्रदर्शन माननीय डॉक्टर संदीप कऱ्हाळे यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजनाबाबत कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा ,कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद अभियान आदी मार्फत दिलेले योगदानाबाबत जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद रहांगडाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.अभिजीत कापगते, हेमंत आंबेडारे, बाळु गायकवाड, हेमंत उंदीरवाडे, राहुल मेश्राम व समस्त आत्मा, कृषि विभाग, कृ.वि.कें. गडचिरोली कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले.

                           मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक                                            EDITOR IN CHIEF.                                           


Post a Comment

0 Comments