Header Ads Widget

Responsive Advertisement

ग्रामपंचायत पुलखल येथील नागरिकांनी पत्रकार कैलास शर्मा यांच्या विरोधात पोलिस स्टेशन गडचिरोली येथे खोटी बातमी देऊन गावकऱ्यांची बदनामी केल्याबद्दल (FIR) तक्रार दाखल करण्यात आली.. P10NEWS


   
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
                                                                            गडचिरोली /दिनांक ,15/12/2022:- गडचिरोली जिल्ह्याच्या सात किलोमीटर अंतरावरील पुलखल या गावात दिंनाक 15/12/2022 रोज गुरुवारला ग्रामपंचायत पुलखल येथे सहामाही वार्षिक ग्रामसभा आयोजित केली होती.

या ग्रामसभेत ग्रामसभा अध्यक्ष निवडण्याकरिता गावकऱ्यांकडून दोन नाव आले .श्रिकांत मोरेश्वर सिडाम व शेकापच्या नेत्या कु. जयश्री वेळदा  परंतु गावकऱ्यांची बहुमत घेण्याअगोदर जयश्री वेळदा यांनी आपले नाव मागे घेतले. यामुळे श्रिकांत मोरेश्वर सिडाम यांची निवड करण्यात आली. यानंतर ग्रामसेवक श्री. मोटघरे यांनी मागील सभेतील विषय वाचन करून ग्रामसभेला सुरुवात केली. तसेच सहामाही विकासाच्या कामांना मंजुरी करिता ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. ग्रामसेवक मोटघरे यांनी सभेत वेळेवर येणाऱ्या अर्जावर चर्चा केली. यावेळी रामदास जराते व जयश्री वेळदा यांच्या अर्जावर ग्रामसेवक यांनी ग्रामसभेत चर्चा केली असता गावकऱ्यांनी मान्यता दिली. परंतु एक दिवसा अगोदर रेती घाट मालकाने रेती साठा विक्री करण्याची परवानगी मिळण्याचे निवेदन सादर केले होते. या निवेदनावर रेती साठा विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी.सदर निवेदनावर गावकऱ्यांनी बहुमताने परवानगी दिली असता. रामदास जराते यांनी ग्रामसभा अध्यक्ष व ग्रामसेवक यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी बहुमतावर ठाम होते. ग्रामसेवकांने नागरिकांच्या बहुमताचा विरोधात जाऊन ठराव लिहिण्यास मनाई केली. आणि ग्रामसभा अध्यक्ष व गावकऱ्यांनी सभा समाप्तीचा आदेश दिला नसताना सुद्धा   रामदास जराते व एक सदस्य सभेतुन निघून गेल्यानंतर गावकरी व ग्रामसभा अध्यक्ष बसुन असताना सुद्धा ग्रामसेवक मोटघरे आपले दस्तावेज घेऊन ग्रामसभेमधुन ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयात गेले. ग्रामसेवकांच्या एकाधिकारशाही मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.परंतु या ग्रामसभेत दोन पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्यासमोर शांतपणे ग्रामसभा झाली. असताना कोणत्याही प्रकारची दारु पिऊन धिंगाणा घातला नसताना. आणी गेल्या दहा वर्षांपासून पुलखल गावातील दारु बंद असताना सुद्धा संबंधित पत्रकार कैलास शर्मा यांनी महाराष्ट्र न्यूज पोर्टल वर ग्रामसभेत बिना परवानगी येऊन फोटो काढून गावकऱ्यांच्या विरोधात खोटी बातमी लावुन बदनामी केली. ही बाब गावातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर सायंकाळी गावातील नागरिकांनी पोलिस स्टेशन गडचिरोली येथे पत्रकार कैलास शर्मा महाराष्ट्र न्यूज पोर्टल यांच्या विरोधात ग्रामसभा व गावातील नागरिकांची नाहक खोटी बातमी देऊन बदनामी केली असल्याची रिपोर्ट दिली. पोलिस स्टेशन गडचिरोली येथे त्यांच्यावर कलम 501 अन्वये एफआयआर( FIR) दाखल करण्यात आली.
                              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          EDITOR IN CHIEF.                                                  


                    

Post a Comment

0 Comments