Header Ads Widget

Responsive Advertisement

गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादनाला सुरूवात *जिल्हयातील शैक्षणिक विकासाला आता गती मिळणार* P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक ( EDITOR IN CHIEF)

गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादनाला सुरूवात

जिल्हयातील शैक्षणिक विकासाला आता गती मिळणार


गडचिरोली, दि.09 : जिल्हयातील गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादन प्रक्रियेला दहा वर्षानंतर प्रशानाच्या तत्परतेने पुन्हा सुरूवात झाली आहे. विद्यापीठाच्या विस्तारीकरणाबरोबरच आता जिल्हयातील शैक्षणिक विकासाला चालना दिली जाणार आहे. लोकांच्या सहमतीने अडपल्ली येथील 64.80 हेक्टर जमिनीची खरेदी सुरू झाली आहे. यातील प्रातिनिधीक स्वरूपात 8 डिसेंबर रोजी एका शेतकऱ्याला जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते धनादेश देवून भूसंपादनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, उपविभागीय अधिकारी मैनक घोष, अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील उपस्थित होते.  


भूसंपादन प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक सहभाग दर्शविला. विद्यापीठाच्या विकासाला आवश्यक असणारी महत्त्वाची बाब म्हणजे जमीन आहे. त्यामुळे आता विद्यापीठ विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. जागतिक स्तरावरचे शिक्षण गडचिरोलीसारख्या दुर्गम भागत स्थानिक विद्यार्थ्यांना देण्यासाठी विद्यापीठाचे बळकटीकरण आवश्यक होते. यासाठी जागा व भौतिक सुविधांची गरज होती. आता जागेचा प्रश्न सुटल्याने त्याठिकाणी आवश्यक भौतिक सुविधा उभारणीसाठी मदत होणार आहे.


गडचिरोली जिल्हा दुर्गम, आदिवासी व रोजगार कमी असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. असे असले तरी या जिल्हयातील विद्यार्थ्यांमधे प्रचंड क्षमता आहे. गरज आहे ती, त्या क्षमतांना शिक्षणाची जोड देवून त्या वृद्धींगत करण्याची. येथील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसीत करून ते जगापुढे नेण्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक सुविधांमधून आता प्रयत्न केले जात आहेत. जिल्हयातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी येथील भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी अतिरीक्त जागेची गरज होती ती आता सुरू झालेल्या भुसंपादनातून सुटलेली आहे.


गडचिरोलीतील युवकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या नोकरी, उद्योग व व्यवसायासाठी क्षमता विकसित करण्यासाठी यातून चालना मिळेल. विद्यापीठाला बी प्लस दर्जा मिळाला. अद्ययावत डेटा सेंटर सुरू झाले. आदिवासी संस्कृतीचा विचार करून स्थानिकांना लाभ होण्यासाठी वनोपजांना धरून विविध अभ्यासक्रमांची जोड देण्यास विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. येथील संसाधनांवर आधारीत उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी विद्यापीठाकडून अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. भूसंपादन प्रक्रियेतून मिळालेल्या जागेवर येत्या काळात शैक्षणिक इमारती उभारून जिल्हयातील शैक्षणिक विकासाला गती निश्चितच दिली जाईल.

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          EDITOR IN CHIEF.                                                      


Post a Comment

0 Comments