अनेकांचे बळी घेणारा SAM- || अधिकृत वाघास जेरबंद करण्यात वनविभागास यश!
ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रामध्ये २८ जून २०२२, १६ ऑगस्ट २०२२, १७ ऑगस्ट २०२२ व ४ नोव्हेंबर रोजी अश्या वाघाच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीमध्ये कॅमेरा ट्रॅप छायाचित्रावरून SAM-II या नर वाघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सदर वाघाचा शेतशिवार परिसरात नियमित वावर असल्याने व मानवी जीवीतास धोका कायम असल्याने SAM-II वाघास (नर) जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती.
त्याअनुषंगाने, दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्र / सायगाटा नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. ११८) सायं ७:०६ वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर तथा प्रमुख RRT व अजय मराठे, शुटर, RRT सदस्य यांनी SAM-II वाघ (नर) याला डार्ट केले व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास त्यांचे चमुचे सहाय्याने पिंज-यात जेरबंद केले.
सदरची कार्यवाही दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली एम बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी, एम. बी. गायकवाड, वनक्षेत्रपाल (प्रा) उत्तर ब्रम्हपुरी, आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल (प्रा) दक्षिण ब्रम्हपुरी वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य बी. आर. दांडेकर, ए. एन. मोहुर्ले, एस. पी. नन्नावरे, ए. डी. तिखट, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर, दिपेश टेंभुर्णीकर, नुर सैयद व राकेश अहुजा ( फिल्ड बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली.
या अनेकांचे जिवे घेणाऱ्या वाघाला, जेरबंद करण्यात आलेल्या SAM-|| वाघाचे (नर) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून सदर वाघाची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे हलविण्यात येईल.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक EDITOR IN CHIEF.
0 Comments