Header Ads Widget

Responsive Advertisement

सिरोंचा तालुक्यात मागील 48 तासात मुसळधार पाऊस, पुढील 2-3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने - तहसीलदार/अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन सिरोंचा समितीने पुरपरिस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे.नागरिकांना केले सावध. P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

सिरोंचा तालुक्यात मागील 48 तासात मुसळधार पाऊस, पुढील 2-3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने - तहसीलदार/अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन सिरोंचा समितीने पुरपरिस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे.नागरिकांना केले सावध.

 सिरोंचा/11:-  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात मागील 48 तासांत अतिवृष्टी झाली आहे.भारतीय वेध शाळेकडून आणखी 2-3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.                                                  तसेच,श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 30 गेट उघडण्यात आलेले असुन पाण्याचा विसर्ग 5 ते 7 लाख क्यूसेक्स आहे.त्याचबरोबर लक्ष्मी बॅरेज (मेडीगट्टा) चे 85 पैकी 45 गेट उघडण्यात आलेले असून सायंकाळपर्यंत 70 गेट उघडण्यात येणार असल्यामुळे पाण्याचा विसर्ग 471980 क्यूसेक्स (13365 क्यूसेक्स) आहे तो 10 ते 12 लाख क्यूसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे.                             त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची संभावना असल्याने नदीकिनारी असलेल्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.तसेच, नदी/नाले भरुन वाहत असल्यास कोणीही नदी/नाले ओलांडू नये.किवा वाहतूक करु नये.तसेच, मासेमारी करण्यास नदी पात्रात कोणीही आपली नावे/होडी टाकु नये.असे आवाहन सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना सिरोंचा तहसीलदार तथा इसिंडंट कमाडंट तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती सिरोंचा द्वारे करण्यात आले

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                   (EDITOR IN CHIEF)

                


Post a Comment

0 Comments