Header Ads Widget

Responsive Advertisement

28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे आयोजन. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे आयोजन


गडचिरोली, दि.26 : दिनांक 28 सप्टेंबर रोजी “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” साजरा करण्याचे शासन निर्णयाद्वारे कळविण्यात आले असून संपूर्ण राज्यात दि. 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने समाज कार्यकर्त्यांकरीता व इच्छुक गटांकरीता माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व, भिंतीपत्र स्पर्धा इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्यख्यानमाला इ. उपक्रम आयोजित करण्यात येतात.


आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 15 ऑक्टोबर 2019 ला 74 व्या युनिस्कोच्या सर्वसाधारण सभेत दरवर्षी राबवण्याचे मंजूर करण्यात आले. यानंतर जागतिक स्तरावर पहिला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर 2016 ला साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी राज्यासह देशभरात सर्वत्र माहिती अधिकार दिन साजरा केला जातो.

                             


Post a Comment

0 Comments