Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी:-06 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


विलय दिनाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी

06 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.

    गडचिरोली/दिनांक, 21 :-  शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच 06 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर, वय 26 वर्ष रा. तिम्मा जवेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो वय 30 वर्ष रा. डांडीमरका पोस्टे आरेच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले. 

आत्मसमर्पीत सदस्याबाबत माहीती

नामे अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर

दलममधील कार्यकाळ

1) माहे डिसेंबर 2009 ला कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे मे 2010 पर्यंत कार्यरत होता.

2) माहे मे 2010 ते 2012 पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता तसेच सन 2012 ते 2022 या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता.  

कार्यकाळात केलेले गुन्हे

1) सन 2011 मध्ये मौजा खोब्राामेंढा अॅम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ 191 बटालियनचे 1 जवान शहीद व 05 जवान जखमी झाले होते.

2) सन 2011 मध्ये मौजा निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील अॅम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ 191 बटालियनचे 05 जवान जखमी झाले होते.

3) सन 2011 मध्ये मौजा छोटा झेलीया जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता


आत्मसमर्पीत होण्याची कारणे.


1) शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही.

2) वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

3) दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही. 

4) पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे.

5) वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वत:च्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही. 

6) खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.

7) नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.




नामे रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो

दलममधील कार्यकाळ

1) सन 2009 ला जटपूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन 01 महीना कार्यरत होती.

2) सन 2009 ते 2015 पर्यंत झोन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होती.

3) सन 2015 ते सन 2018 पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावर कार्यरत राहून माहे जुलै 2018 ते सन 2022 पर्यंत घरी राहून दलमचे काम करत होती.

कार्यकाळात केलेले गुन्हे

1) सन 2015 मध्ये मौजा कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती.

2) सन -2015 मध्ये मौजा गुंडूरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती.

3) सन 2017 मध्ये मौजा दुरवडा (छ.ग.) येथे गोटूलमध्ये झालेल्या व जंगल परिसरात झालेल्या एकुण दोन चकमकीमध्ये सहभागी होती.

4) सन 2015 मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा इरपनार गावातील 03 इसमाचा तीने खुन केलेला आहे.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे.


1) नक्षलींना कोणत्याही कामासाठी पैसे दिले जात नाही.

2) नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो.

3) महीला नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही.

4) महीला नक्षलवाद्यांना फक्त अवजड कामे दिली जातात व त्यांना महत्वाच्या अभियानात सहभागी केले जात नाही.

5) वरिष्ठ माओवाद्याकडून महीला नक्षलींना लग्नासाठी बळजबरी केली जाते

6) पोलीस - नक्षल चकमकीदरम्यान महीला नक्षलींना समोर करून पुरूष नक्षलवादी हे पळून जातात.


महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले बक्षीस.


1) महाराष्ट्र शासनाने अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर याचेवर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

2) रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.


आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.

3) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर यास एकुण 5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

4) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो हीला एकुण 5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकुण 51 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अंकित गोयल साो. यांनी  केले आहे.

                               मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.   

                                     (EDITOR IN CHIEF)

                                     


Post a Comment

0 Comments