Header Ads Widget

Responsive Advertisement

नक्षल सप्ताहदरम्यान गडचिरोली पोलिस विभागाची मोठी कारवाई -नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले साहित्य, स्फोटके हस्तगत करण्यात यश P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


    गडचिरोली/दिनांक,05:- गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांकडुन दिंनाक  27 जुलै ते 03 ऑगस्ट पर्यंत नक्षल सप्ताह साजरा करतात.यादरम्यान नक्षली सरकार विरोधात अनेक हिंसक कारवाया व घातपात घडवून नुकसान करण्याचा प्रयत्न करित असतात व निष्पाप नागरिकांची हत्या करुन आपली दहशत निर्माण करतात.व जंगलात अनेक ठिकाणी नक्षल साहित्य, स्फोटके जमिनीत पुरुन ठेवतात.नक्षल अभियानात पोलिस जवान नक्षलविरोधी कारवाया करण्याकरिता जंगलात फिरत असतात.पोलीस जवानांना घातपात घडवून आणन्याचा उद्देशाने जमिनीत साहित्य स्फोटके पुरुन ठेवतात.

    दिनांक 04/08/2022 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमके कोटगल हद्दीमध्ये मौजा हेटाळकसा जंगल परिसरात कोरची एलओएस टिप्पागड एलओएस व कंपनी क्र.04 च्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचवून मोठा घातपात घडवून आणन्याचा उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारुगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवले असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे मा.पोलीस अधिक्षक श्री.अंकीत गोयल सा.आदेशाने मा अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान)श्री.सोमय्य मुंडे सा.यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान राबविण्याची योजना आखण्यात आली.सदर योजनेनुसार विशेष अभियान पथक गडचिरोली सिआरपीएफ192 बटालियनचे यंग प्लाटुनचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान मौजा हेटाळकसा जंगल परिसरामध्ये नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका संशयीत ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात जवानांना मोठे यश आले.सदर डंप हे पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या मोठ्या लपवून पुरुन ठेवण्यात आले होते.यामध्ये दोन नग कुकर त्यापैकी स्फोटकांनी एक भरलेला,04 नग कार रिमोट,03 नग वायर बंडल 08 पॉकेट डिस्टेंबर कलर , पिवळ्या रंगाचा पावडर अंदाजे 01 कि.ग्र.,राखडी रंगाचा पावडर अंदाजे 02कि.ग्र., पांढ-या रंगाचा पावडर अंदाजे 01 पाव, पांढरा दाणेदार पदार्थ अंदाजे 50 कि.ग्र.,02 नक्षल पुस्तके,01 नग प्लास्टिकची पाणी साठवून ठेवण्याची टाकी 500 लिटर क्षमतेची वरिल सर्व स्फोटके, साहित्य याचं टाकीमध्ये साठवून ठेवण्यात आलेले नक्षल साहित्य हस्तगत करुन , घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.यात 02 नग कुकरपैकी स्फोटकांनी भरलेला बीडीडीएस पथकाच्या साहाय्याने अत्यंत सतर्कतेने जागेवरचं नष्ट करण्याय आले.

   सदर कामगिरीवर मा. पोलिस अधीक्षक श्री.अंकीत गोयल सा.गडचिरोली यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली, सिआरपीएफ बटालियन 192 यंग प्लाटुनचे जवान व बीडीडीएस पथकाचे कौतुक केले आहे. तसेच जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आल्याचे सांगितले. नक्षलवाद्यांनी नक्षल हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जिवन जगण्याचे आवाहन केले.

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF).                                               


Post a Comment

0 Comments