Header Ads Widget

Responsive Advertisement

धानोरा ते गडचिरोली परिसरातुन कतलीकरीता अवैध गोवंश (जनावरे) वाहतूक करणाऱ्या टोळीस पकडुन गडचिरोली पोलिस स्टेशन पथकाने केली अटक P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

 अवैध जनावरांची  निर्दयपणे पाय बांधून दाठी वाटीने कोंबुन गोवंश (गाय,बैल,गोरे) सिमावर्ती भागातुन  कतलीकरीता वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक पकडुन चालकासहीत 03 आरोपीताविरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद.

        गडचिरोली/ आज दिनांक 02/08/2022:- कर्तव्यावर असताना विश्वणीय माहिती मिळाली की, एम एच /40 ,बी.एल.2705 चा चालक त्याचे इतर सहकार्यासोबत छतिसगड सिमावर्ती भागातुन मार्गे धानोरा गडचिरोली, चंद्रपूर कडे अवैधरित्या   गोवंश  (जनावरे,गाय,बैल,गोरे) कतलीकरीता  वाहतूक करित आहेत. खबरेवरुन दोन प्रतिष्ठित/निस्वार्थी पंचांना सोबत घेऊन  धानोरा ते गडचिरोली रोडवर पाळत ठेवून  गडचिरोली पोलिस मुख्यालयापासुन 15 की.मी.अंतरावरील मौजा -सावरगाव येथे   सापडा रचुन भरधाव वेगाने येणा-या लाल रंगाची दहाचाकी ट्रक  वाहन क्रमांक एम.एच/40, बी.एल.2705 थांबवून पंचासमक्ष  झडती घेतली असता. एकुण 34 गोवंश (जनावरे,गाय बैल,गोरे) त्यातील 1,मृतावस्थेत असलेला  किंमत 1)1,12, 200, रुपयांचे  गोवंश जनावरे 2) दहाचाकी ट्रक  एम.एच./40,बी.एल.2705 त्याची किंमत 10,00,000/-  रु.असे एकुण 11,12,200/- रुपयांचे माल यातील आरोपीत नामे 1)मा. सुरेन्द्र सरदार सिंग  वय 48 वर्षे व्यवसाय चालक या.कमालचौक लक्षरीबाग नागपूर, ता.जि.नागपुर व त्याचे सहकारी 2) विकास संतोष यादव वय 27 वर्षे व्यवसाय मजुरी रा.हदकुसपारा,ता उदई,जि.दुर्ग (छ.ग.राज्य) 3) भोला जिवन गिरी वय 26 वर्षे व्यवसाय मजुरी रा.आदर्शनगर ता.उदई,जि.दुर्ग  (छ.ग.राज्य) 4) नितिश योगेंद्र यादव वय 31 वर्षे व्यवसाय मजुरी रा.भवानी बिगार ता.करायपरसोराय जि. नालंदा (बिहार राज्य) असे नमूद वाहनातून निर्दयपणे पाय बांधून दहाचाकी ट्रक मध्ये दाटीवाटीने जबरदस्तीने अमानुषपणे कोबुंन  पाय बांधून जनावरांना कतलीकरीता वाहतूक करित असताना  पकडले.संबधित नमुद आरोपींना गडचिरोली पोलिस स्टेशन मध्ये पकडुन विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

   तुर्तास गोवंश (जनावरे गाय,बैल,गोरे) यांची पशुवैद्यकीय अधिकारी कडुन वैद्यकीय  तपासणी करण्यात आली.सुरक्षेच्या दृष्टीने  जनावरांना लांझेडा येथील कोंडवाळ्यात ठेवून लागलीच भारतीय गौवंश गो-शाळा संस्था (अध्यक्ष) तळोधी. (बालापुर)शाखा गोविंदपुर ,ता. जि.चंद्रपुर   येथे रवाना करण्यात आले.सदरची कारवाई मा श्री.अंकीत गोयल पोलिस अधीक्षक गडचिरोली, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)मा. ‌‌‌समीर शेख गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उपविभगीय पोलिस अधिकारी मा.श्री.प्रविण गिल्डा, पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम,मसपोनी/पुनम गोरे ,पोहवा/ 845 प्रमोद वाळके, ,पोहचवा/  1781 खेमराज नवघरे  ,पोहचवा/1626,चंद्रभान मडावी,चालक धोटे एकनाथ धोटे या पोलिस पथकांनी पार पाडली.अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनी संघमित्रा बांबोळे या करित आहेत.असा प्रकारे पोस्टे परिसरात गोवंश जनावरे पाय बांधून कोंबुन कतलीकरीता वाहतूक करताना सुगावा लागल्यास  पोलिस स्टेशन गडचिरोली येथे त्वरित माहिती द्यावी.

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF).                                                


Post a Comment

0 Comments