*जिल्हा प्रशासनाला कोणत्या ठिकाणावरुन तिरंगा पुरवठा करण्यात आले.
*कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या कंपनीने तिरंगा पुरवठा केला.
* जिल्हा प्रशासनाने कोणत्या आदेशाने (जीआर) नुसार कोणत्या सरकारी कोषातुन निधी तिरंगा खरेदी करिता वापरली.
निधीची मान्यता घेतली काय? किती निधी खर्च केली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण भारतात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत असून,या अभियानाला राबविण्यासाठी शासनाने झेंडा नियमावलीत च बदलवून सुती कापड ऐवजी पॉलिस्टर कापडाचा तिरंगा झेंडा तय्यार करण्याची परवानगी दिलेली आहे.परंतु पॉलिस्टर कापडाचा झेंडा तय्यार करतांना झेंड्याचा आकार,चक्र चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याने अनेक ठिकाणी तिरंग्याचा अपमान होतांना दिसून येत आहे.
आज गडचिरोली शहरात नगर पालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत प्रत्येक घरात मोफत तिरंगा झेंडा देण्यात येत असून तिरंग्यात चुका असताना सुध्दा मुद्दाम दुर्लक्ष करून झेंडा वाटप करण्यात आले आहे.या वरून शासनाच्या आदेशानुसार तिरंगा झेंडा वाटप करायचे असेल तर,त्या झेंड्याचा असलेल्या चुकीच्या बाबी दुरुस्त करून घेणे ही सुध्दा जबाबदारी नगर पालिकेच्या वतीने घेतल्या गेलेली नाही.
आज कार्यालयात नगर पालिकेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या तिरंग्यात केसरी,पांढरा,आणि हिरवा रंगाचा पट्टा वेग वेगळ्या आकाराचा बनविण्यात आला असून,या झेंड्याचा केसरी पट्टा सा पाच इंच,पांढरा पट्टा साढे सात इंच आणि हिरवा पट्टा साढे आठ इंच रुंद असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ नगर पालिकेच्या वतीने फक्त झेंडा वाटप करून संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे.
जागोजागी तिरंगा झेंड्याची अवमानना होत असल्याने,चुकीच्या आकारमानाचा झेंडा फडकवायचा कसा असा प्रश्न अनेक लोकांसमोर निर्माण होत असल्याचे विदारक वास्तव चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
यावरून शासनच झेंड्याची आन, बान,शान आणि मान पायदळी तुडवत असेल तर,तक्रार करायची तरी कोणाला असा धर्मसंकट तिरंग्याचा आदर करणाऱ्या जनतेसमोर उभा राहिला आहे.
नगर पालिका मुख्य अधिकारी विशाल वाघ यांचे प्रतीवेदन….
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत प्रत्येक घरात तिरंगा झेंडा वाटप करतांना खबरदारी घेण्यात आली आहे,तरी पण अनावधानाने चुकीच्या आकारमानाचा झेंडा कोणाला देण्यात आलेले असेल तर ते आम्हाला परत करावे असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने मी करीत आहे…
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.
(EDITOR IN CHIEF)
0 Comments