Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली पोलिस विभागाची मोठी कामगिरी -छतिसगड राज्याची रहिवासी असलेली जहाल महीला नक्षलीस अटक. P10NEWS

मंदीप एम.गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


 गडचिरोली पोलिस विभागाची मोठी कामगिरी -जहाल महीला नक्षलीस अटक.

गडचिरोली/04:- गडचिरोली जिल्ह्यात नक्षल दिनांक28 जुलै ते ०३ ऑगस्ट ला नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करित असतात.यादरम्यान नक्षली सरकार विरुद्ध कट कारस्थान करून सरकारविरोधी मोठ्या हिंसक जिल्ह्यात कारवाया करित असतात.यामुळे गडचिरोली पोलिस विभागाने जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोधी अभियान चालवुन व हिंसक कारवाया रोखण्यासाठी जिल्हाभर नाकाबंदी केली.दिंनाक 03/08/2022 ला उपविभागीय पोलिस कार्यालय एट्टापल्ली पोस्टे अंतर्गत पोस्टे एट्टापल्ली येथील पोलिस स्टॉपनी नाकाबंदी केली असता.एक महीला संशयरित्या आढळून आल्यानंतर पोलिस जवानांनी महीला पोलीसांच्या माध्यमातून त्या महीलेची चौकशी केली असता.तीने सोबत बाळगलेल्या साहित्यावरुन ती जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी कसनसुर दलम सदस्य असल्याचे समजले.त्यावरुन पोलिस जवांनानी तीला ताब्यात घेऊन अटक करुन ठेवली आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री.सोमय्या मुंडे,सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.समीर शेख.सा. अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री.अनुज तारे सा.यांचे नेतृत्वात करण्यात आली.

        अटक करण्यात आलेली जहाल महिला नक्षली.कसनसुर दलमच्या सदस्य पदावर आहे.आणी ती छतिसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्याची माहिती हाती लागली आहे.तिच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिच्यावर दोन लक्ष रुपयांचे जाहीर बक्षीस ठेवले होते.तिचा किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.याचा तपास गडचिरोली पोलिस विभाग करित आहे.

       सदरची कारवाई करणाऱ्या पोलिस जवानांचे पोलिस अधीक्षक श्री.अंकीत गोयल यांनी कौतुक केले.व नक्षलवाद्यांनी नक्षली वाट सोडून आत्मसमर्पण करावे असे आवाहन नक्षल्याना केले.

                 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF).                                                         


Post a Comment

0 Comments