Header Ads Widget

Responsive Advertisement

केंद्राची दुसरी शिक्षण परीषद तसेच सेवानिवृत्ती सत्कार-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राम्हणी येथे दिनांक २४/८/२०२२बुधवारला आंबेशिवणी केंद्राची दुसरी शिक्षण परीषद झाली. P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
 

      गडचिरोली/दिनांक २६:- केंद्राची दुसरी शिक्षण परीषद तसेच सेवानिवृत्ती सत्कार-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राम्हणी येथे दिनांक २४/८/२०२२बुधवारला आंबेशिवणी केंद्राची दुसरी शिक्षण परीषद झाली.या कार्यक्रमात अध्यक्ष श्री सुरेश बांबोळकर केंद्र मुख्याध्यापक उद्घाटक श्री विनायक इंगळे मुख्याध्यापक विशेष अतिथी श्री निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी आयोजक श्री प्रभाकर बारशिंगे केंद्र प्रमुख सत्कारमूर्ती श्री प्रकाश रासेकर सौ रासेकर सौ जाहेदा शेख कुमारी पायल गावंडे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक भारती शिवणकर सचिन मेश्राम निवास कोडाप आशिष बांबोळे करमचंद भोयर अविनाश येनप्रेडीवार सुषमा बावणे सुनिता मडावी साधना मट्टे विजया कुमरे जयश्री कापकर शालु नन्नावरे उपस्थित होते.प्रास्ताविक श्री सुरेश बांबोळकर यांनी सत्कारमूर्ती यांनी शाळेसाठी चांगले काम केले.तसेच ५८वर्ष झाले नंतर सेवानिवृत्त व्हावे हे लिखित आहे.कामावर असताना लोकांमध्ये चांगली ओळख असते यासाठी आपण चांगले काम केले पाहिजे ते यांनी केले असे सांगितले.प्रभाकर बारशिंगे केंद्र प्रमुख यांनी शि‌क्षकांनी फुलोरा उपक्रम चांगला राबविले याबाबत त्यांचें गुणगान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.श्री निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शिक्षण परीषद हा एक मंच असुन शिक्षकांचा यामध्ये विकास होत असतो.फुलोरा उपक्रम राबविताना अडचणी येऊ नयेत यासाठी आपण परिषदेत साहित्य बनवून पाठ घेऊन दाखवता यामुळे एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही.याकरीता सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.निपुन भारत याविषयावर सुरेश बांबोळकर यांनी मार्गदर्शन केले.गणित व भाषा या विषयावर प्रात्यक्षिक द्वारे पाटाचे सादरीकरण केले.श्री प्रकाश रासेकर सौ रासेकर मॅडम सौ जाहेदा शेख कुमारी पायल गावंडे यांना श्री निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी सागर आत्राम समिर भजे शामराव रामटेके नालंदा इंदूरकर मेश्राम मॅडम प्रल्हाद जेंगठे सुषमा धारणे  संजय येलेवार  नागसाय मुलावी उईके हलामी आयलवार भडके कुळमेथे रामटेके पुण्यपवार कोटरंगे भैसारे हर्षे जुआरे कामुनवार हृलामी मद्दावार विद्यार्थी आणि गावकरी यांनी सहकार्य केले सुत्र संचालन श्री अमोल जोशी संगिता लाकडे तर आभार श्री जगदिश मडावी यांनी केले.कार्यक्रमाचा शेवट वंदेमातरम या गिताने झाला.

                 

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                          (EDITOR IN CHIEF)

                      


Post a Comment

0 Comments