Header Ads Widget

Responsive Advertisement

"स्वातंत्र्य अमृत महोत्सव"निमित्ताने पोलिस स्टेशन गडचिरोली तर्फे शासकीय आदिवासी इंग्रजी मा. आक्षमशाळेत जनजागृती कार्यक्रम. P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

 

गडचिरोली/04:-. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर  गडचिरोली पोलिस स्टेशन तर्फे शासकीय आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळा,सेमाना रोड गडचिरोली येथे जाऊन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमात महीला सपोनि पुनम गोरे, महीला पोउपनी बांबोळे, तसेच महीला व बाल विकास विभाग गडचिरोली श्री.भांडारवार, श्री.शेंडे, यांनी मुलीच्या सुरक्षिततेबाबत, सध्या घडत असलेल्या साइबर क्राइम,अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, रस्ता सुरक्षा इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलिसांकडे असलेले हत्यारी1) एके - 47 2)एस.एल.आर. 3)9 एम.एस.पिस्टल इत्यादी हत्यासंबंधी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमात वर्ग 05 ते 10 पर्यंतचे 100 ते 125 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.   

                          (EDITOR IN CHIEF)

                        Post a Comment

0 Comments