Header Ads Widget

Responsive Advertisement

पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी विस हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करा : संदिप तिमाडे चामोर्शी P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

पूरग्रस्त शेतकऱ्यांना  एकरी विस हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करा : संदिप तिमाडे चामोर्शी :                         संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी  नदी -  नाल्यांना पूर आला आहे.  काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. शेती आणि पिके खरडून गेली आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना शासनाने प्रति एकरी २० हजारांची तातडीने मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप तिमाडे यांनी केली आहे.

पावसामुळे तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे अनेकांची जमीन खरडून गेली आहे. तर काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं आहे. धान, सोयाबीन,  कापूस, तूर या पिकांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. गडचिरोली आणि  चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संदिप तिमाडे यांनी चामोर्शी, गोंडपिपरी तालुक्यातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना एकरी विस हजार रुपये प्रति मदत करा अशी मागणी केली आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपुर, हळदी, हळदी माल, मुधोली रिट, मुधोली, जयरामपूर, कढोली, अनखोडा व गोंडपिपरी तालुक्यातील वढोली, कुलथा, हेटी, भणारहेटी, नादगाव आदि गावांना भेटी दिल्या. यावेळी तालुका कृषी  अधिकारी राठोड,  तलाठी झाडे उपस्थित होते.

                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

               (EDITOR IN CHIEF)

            


Post a Comment

0 Comments