Header Ads Widget

Responsive Advertisement

शैक्षणिक विद्यापीठात धार्मिक कार्यक्रम किंवा मुर्तिपुजन करु नये.बसपा गडचिरोली पक्षाची कुलगुरूंकडे मागणी. P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


भारतीय संविधानाच्या मूलतत्व नुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार कुठल्याही सरकारी कार्यालयात कुठलेच धार्मिक संस्कार, उत्साह व मूर्तिपूजा करू नये.   परंतु आमच्या निदर्शनास आले आहे की मागील वर्षापासून आपल्या विद्यापीठात  गणपती मांडल्या जात आहे.  विद्यापीठ हें शिक्षणाचे केंद्राबिंदू आहे व त्यात बरेच जाती धर्माचे विद्यार्थी व कर्मचारी कार्यरत आहेत त्यामुळे सरकारी विद्यापीठात संविधानिक मूल्यांचे पायमल्ली होवू नये या करिता धर्मनिरपेक्ष तत्वाचे पालन करावे. व आपल्या गोंडवाना विद्यापीठात गणपती बसवू नये व इतर वेळी कुठल्याही धर्माचे संस्कार, पूजा व कार्यक्रम करण्यात येवू नये.  तसेच विद्यापीठात संघ प्रणित विचाराचे वर्चस्व व त्यांच्या मूल्यांना अधिक महत्त्व दिल्या जात आहे असे आमच्या निदर्शनात आले आहे. वरील धार्मिक कार्यक्रम शासकीय कार्यालयात घेणे   हें संविधान मुल्याचा अपमान आहे अस आम्ही समजतो.

त्यामुळे कोणत्याही विशिष्ट धर्माचे कार्यक्रम विद्यापीठात साजरे केले जाऊ नयेत व मूर्तीची पूजा केली जाऊ नये. तस निदर्शनास आल्यास विद्यापीठासमोर तीव्र आंदोलन केल्या जाईल यासाठी आपण जबाबदार राहणार.. अशी मागणी गणपतजी तावाडे जिल्हा प्रभारी ,बहुजन समाज पार्टी    गडचिरोली

==============++====

Post a Comment

0 Comments