Header Ads Widget

Responsive Advertisement

भारतीय स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्य गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक श्री डॉ . किशोर मानकर व आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री राहलसिंह टोलीया यांच्या मार्गदर्शना खाली विविध स्पर्धात्मक कार्यक्रम P10NEWS

 




मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

         

         भारतीय स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्य गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक श्री डॉ . किशोर मानकर व आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री राहलसिंह टोलीया यांच्या मार्गदर्शना खाली आलापल्ली वनविभागातील आलापल्ली ,अहेरी , पिरमिली , पेड्डीगूडम , मार्कंडा, घोट व चामोर्शी वनपरिक्षेत्रा मध्ये " हर घर तिरंगा " या अभियानाचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणांवर मोटरसायकल रैली , वृक्षारोपण , वकृत्य स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वनसंपदा इमारत आलापल्लीच्या प्रांगणावर स्वातंत्र्य दिना निमित्य वनकर्मचारी यांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री डॉ . किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त व अध्यक्ष म्हणून श्रीमती पियुशा जगताप उपवनसंरक्षक वाहतुक विभाग बल्लारशाह, श्री आशीष पांडे उपवनसंरक्षक भामरागड, श्री राहुलसिंह टोलीया उपवनसंरक्षक आलापल्ली , श्री वरून आर बी भावसे परिविक्षाधिन उपस्थित होते . 

        परेड मध्ये आलापल्ली व भामरागड वनविभागातील 11 वनपरिक्षेत्राच्या चमुने सहभाग घेतला होता . प्रथम क्रमांक घोट वनपरिक्षेत्राच्या पथकाने, द्वितीय क्रमांक आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या पथकाने व तृतिय क्रमांक ताडगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने पटकाविला . सदर परेडचे परिक्षक म्हणून श्री राजेंद्र कातखेडे वनपरिक्षेत्र अधिकारी तथा माजी सैनिक यांनी काम पारपाडले . तसेच या प्रसंगी आलापल्ली वनविभागा अंतर्गत वन व वन्यजीवांचे संरक्षणाचे उत्कृष्ट काम करणारे वनविभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणारे 47 क्षेत्रीय कर्मचारी वनमजुर, वनरक्षक व वनपाल व कार्यालयीन काम करणारे लिपीक , लेखापाल यांना श्री डॉ . किशोर मानकर, श्रीमती पियुशा  जगताप उपवनसंरक्षक यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . 

       या प्रसंगी श्री डॉ. किशोर मानकर वनसंरक्षक यांनी परेडला संबोधीत करताना गडचिरोली वनवृत्ता अंतर्गत 12726.957 हेक्टर क्षेत्र असून सदर वनक्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी हि वनविभागाच्या खांद्यावर आहे . विकास कामांकरीता मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भिती निर्माण झाली आहे . त्यामुळे पर्यावरणाचा समतोल अबाधित राहणे हे जिवसृष्टीच्या समृद्धी करीता महत्वपुर्ण असल्याने मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन केले . तसेच स्वतंत्र्य रनसंग्रामाच्या अग्नीकुंडात अनेक महान विरपुरूषांनी  आपल्या प्राणाची आहुती देत आपल्या देशाला स्वतंत्र्य मिळवून दिले . ते स्वतंत्र्य अबाधित ठेवण्याचे जबाबदारी आपली सर्वांची असून गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त दुर्गम भागतील खेडेपाडे व टोले मधील घरा-घरांनवर या प्रसंगी फडकलेल्या तिरंगाध्वजांचे चित्र हे स्वतंत्र्यांची सुखद अनुभूती देणारे आहे असे मनोगत व्यक्त केले . 

    श्री राहुलसिंह टोलीया उपवनसंरक्षक यांनी परेडला संबोधीत करताना भारतीय स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्य घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे तिरंगाध्वज विषयीचे प्रेम व आस्था जनसामान्या मध्ये वृद्धिंगत झाली असून प्रत्येक नागरीकांन  मध्ये देशप्रेमाची भावना मोठ्या प्रमाणावर वाढली आहे . प्रत्येक क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी सामान्य नागरीकांन सोबत सलोख्याचे संबंध निर्माण करून वन व  वन्यजीवाच्या शाश्वत विकास करीता जनसामान्याच्या सहभागातून वनाचा विकास करण्याचे आवाहन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना केले . 

      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री नितेश शंकर देवगडेEE उपविभागीय वन अधिकारी व श्री रविंद्र सुकारे कार्यालय अधीक्षक यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रदिप बुधनवार प्रकाष्ट निष्कासन अधिकारी आलापल्ली यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आलापल्ली वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                         (EDITOR IN CHIEF)

                     


Post a Comment

0 Comments