Header Ads Widget

Responsive Advertisement

पोळा उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोष्टे गडचिरोली परिसरात अवैध दारू विक्री संबंधात विविध ठिकाणी छापेमारी करून आरोपितांकडुन 2,05,750/- देशी व मोहसडवा जप्त, 07 आरोपींना केली अटक. P10NEWS

 

पोळा उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पोष्टे गडचिरोली परिसरात अवैध दारू विक्री संबंधात विविध ठिकाणी छापेमारी करून आरोपितांकडुन  2,05,750/- देशी व मोहसडवा जप्त, 07 आरोपींना केली अटक.

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

    गडचिरोली/दिनांक 25:- पोळा सनाच्या पाश्र्वभूमीवर व इतर सनाच्या निमित्ताने शहरात, परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी.व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोष्टे गडचिरोली परिसरात दिनांक 25/08/2022 रोजी मिळालेल्या विश्वनिय बातमीनुसार विविध ठिकाणी छापेमारी करुन इसम नामे- 


१) श्री.मोरेश्वर परसुराम ठाकरे वय ४१ वर्षं रा.पोर्ला गांधी वार्ड यांचे घराची प्रोव्हीबिशन बाबत घर झडतीघेतली असता,त्यांचे घरातुन ९०,एमएल च्या ३९५ क्षमतेचा सिलबंद निपा किंमत 19750/-रुपये.

२) परशुराम दामो ठाकरे,रा.पोर्ला गांधी वार्ड गडचिरोली यांच्या घराची प्रोव्हीबिशन बाबत घर झडती घेतली असता त्यांच्या घरातुन २० लिटर क्षमतेची हातभट्टी गावटी मोहा दारु किंमत ३०००/- रुपये.

३) श्री.दादाजी देवाजी मेश्राम वय ६५ वर्षं , गांधी वार्ड,पोर्ला ता + जि:-गडचिरोली यांच्या घराची झडती घेतली असता त्यांचे राहते घरातुन १० लिटर क्षमतेची हातभट्टी गावटी मोह दारु किंमत १५००/- रुपये.

४) हेमंत उरकुडा राऊत वय ४६ वर्षं रा.पोटेश्वर रोड, पोर्ला ता,जि-गडचिरोली यांचे घराची प्रोव्हीबिशन बाबत घर झडती घेतली असता त्यांच्या घरातुन २५० लिटर हातभट्टी गावटी मोहा दारु किंमत १०,०००/- रुपये.असा एकुण ३४,२५०/- रुपयांचा माल जप्त.

तसेच मौजा मुरुमबोडी जंगल परिसरात पोलिस पथक गस्तीवर असताना काही इसम मुरुमबोडी आंबेटोला जंगल परिसरात मोह सडवा टाकुन मोठ्या प्रमाणात हातभट्टी मोहा दारुची निर्मिती/गाळुन गडचिरोली परिसरात हातभट्टी मोहा दारु रात्रोदरम्यान परिवहन करणार आहेत असा विश्वसनीय खबरेवरुन 

१) मंगरु गंगाराम भोयर,२) बयाबाई जितरु कुमरे,३) भावेश वटी सर्व रा.मुरुमबोडी जि. गडचिरोली असे दारु गाळीत असताना घनदाट ज़गलाचा फायदा घेऊन पळून गेले.पंचासमक्ष पाहणी केली असता.त्याच्या ताब्यातुन 

१)१० लिटर क्षमतेच्या ०७ प्लास्टिकच्या कॅनमध्ये ७० लिटर हातभट्टी गावठी मोहा दारु किंमत २१,०००/- रुपये.

२)५० किलो क्षमतेच्या ४३ निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक ड्रम मध्ये २१५० किलो हातभट्टी मोह सडवा किंमत १,५०,५००/-रु.असा एकुण २,०५,७५०/- रुपये (दोन लक्ष,पाच हजार सातशे पन्नास) रुपये ची देशी हातभट्टी गावठी मोहा दारु पोळा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विक्री करिता साठवून व गाळीत असताना नमुद आरोपी मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध पोष्टे गडचिरोली येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई मा. पोलिस निरीक्षक श्री.अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ/प्रभाकर भेंडारे,पोहवा शकील सय्यद , गंगाधर जुवारे,पोशि रमेश कौमिरे व मुक्तीपथ संघटक यांचे पथकांनी पार पाडली.


           मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

             (EDITOR IN CHIEF)

          
Post a Comment

0 Comments