Header Ads Widget

Responsive Advertisement

एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सरखेडा ग्रामपंचायतमध्ये सन 2020 तेंदुपत्ता बोनसचा घोळ. व 15 वित्त च्या निधीचा विनियोग वाढीव पाणीपुरवठा कनेक्शनमुळे लाखो रुपये खर्च करूनही एक थेंब पाणी न मिळाल्याने ग्रामसभेत नागरिकांची बोंबाबोंब - ग्रामसभेत ग्रामसेवकांने मारली दांडी. P10NEWS



एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सरखेडा ग्रामपंचायतमध्ये सन 2020 तेंदुपत्ता बोनसचा घोळ. व 15 वित्त च्या निधीचा विनियोग वाढीव पाणीपुरवठा कनेक्शनमुळे लाखो रुपये खर्च करूनही एक थेंब पाणी न मिळाल्याने ग्रामसभेत नागरिकांची बोंबाबोंब - ग्रामसभेत ग्रामसेवकांने मारली दांडी.  P10NEWS 

 गडचिरोली/एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत सरखेडा येथे 15 वितची निधी व 2020 चे मजुरांच्या तेंदुपत्ता बोनस मध्ये निधिची अफरातफर केल्यामुळे नागरिकांमध्ये 23/08/2022, ला बोंबाबोंब.ग्रामसभेला ग्रामसेवक श्री.चहांदे यांनी मारली दांडी, 

   


    सरखेडा ग्रामपंचायत मध्ये 15 वित निधीचा  ग्रामसेवकांनी नियोजन केला चुकीच्या पद्धतीने वाढीव पाणीपुरवठा द्वारे नागरिकांना दोन वर्षांपुर्वी नळ कनेक्शन व पाईप लाईन देण्यात आली.परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता.नागरिकाना लाखो रुपये खर्च करून एक ही थेंब पाणी गेल्या दोन वर्षांपासून मिळालेला नाही.ती बंद असल्यामुळे नळ कनेक्शन व पाइपलाइन निकृष्ट दर्जाची असल्यामुळे सळली. यामुळे नागरिकांनी ग्रामसभेत सरपंच व उपसरपंच यांच्यावर बोंबाबोंब करुन प्रश्न उपस्थित केला.

          तसेच सरखेडा ग्रामपंचायत येथील नागरिकानी मजुरांना सन 2020 चे तेंदुपत्ता प्राप्त न झाल्याने तसेच ग्रामसभेत ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे नागरिकांनी सरपंच व उपसरपंच यांना तेंदुपत्ता बोनसचे लाखो रुपये गेले कुठे? असं प्रश्न उपस्थित करुन घेरला असता ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे पासबुक नाही.असे उत्तर देऊन सरपंच व उपसरपंचांनी याबद्दल टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला.

       नागरिकांनी सन 2020 च्या मजुरांच्या तेंदुपत्ता बोनसची अफरातफर करणा-या ग्रमसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली.व तेंदुपत्ता बोनस त्वरित देण्याची मागणी केली.

        सरखेडा येथील ग्रामसेवकांने ग्रामसभेत मारली दांडी यामुळे ग्रामसभेत नागरिक त्रस्त झाले.सन 2020 तेंदुपत्ता बोनस न मिळाल्याने  व 15 वित्त च्या लाखो रुपयांचा निधी खर्च करुनही एक थेंब सुध्दा पिण्याचे पाणी न मिळाल्याने नागरिक त्रस्त.   चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सरखेडा नागरिकांद्वारे होत आहे.



                       मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक
                         
                         (EDITOR IN CHIEF)
                       
                        

Post a Comment

0 Comments