Header Ads Widget

Responsive Advertisement

गोवंश तस्कर रोखण्यात गडचिरोली पोलीस दलास यश, दोन वेगवेगळ्या घटनेतील कारवाईत एकुण 14 ट्रक जप्त P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

गोवंश तस्कर रोखण्यात गडचिरोली पोलीस दलास यश, दोन वेगवेगळ्या घटनेतील कारवाईत एकुण 14 ट्रक जप्त


श्व् 403 गोवंश जनावरांची मुक्तता.

     गडचिरोली/ गोवंश तस्करी करणारे काही तस्कर हे गडचिरोली जिल्ह्रातील स्थानिक शेतक­यांकडून गोवंश जनावरे खरेदी करून त्यांना मालवाहु वाहनामध्ये अपु­या जागेत कोंबुन दाटीवाटीने व निदर्यतेने भरून कत्तली करीता दुरवरील शहरात विक्री करीता घेवुन जात असतात. अशा तस्करावर पायबंद घालण्यासाठी मा. पोेलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., यांचे आदेशाने मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी, प्राणहिता श्री. अनुज तारे सा., यांचे मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या घटनेतील नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी गोवंश जनावरांची तस्करी करणा­या 14 ट्रकमधील एकुण 403 गोवंश जनावरांची सुटका करण्यात यश मिळाले.

        दि. 18/08/2022 रोजी पुराडा ते कुरखेडा मार्गे गोवंश तस्कर कत्तली करीता जनावरे 10 ते 12 ट्रकमध्ये कोंबुन नेत असल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कुरखेडा व पोस्टे कुरखेडा येथील पथकाने कुरखेडा जवळील गोठणगाव फाटा वन नाका येथे नाकाबंदी करून सापळा रचून कत्तलीसाठी वाहतुक करणारे 09 ट्रक पकडून 278 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली. 

       तसेच दुस­या घटनेत दि. 19/08/2022 रोजीचे रात्रौ 01.00 वा. कत्तली करीता जनावरे ट्रकमध्ये कोंबुन बोटेझरी मार्गे येत असल्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री. मयुर भुजबळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार गट्टा (फु.) मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कत्तलीसाठी वाहतुक करणारे 05 ट्रक फुलबोडी येथे पकडून एकुण 125 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. सदर दोन्ही कारवाईमध्ये गोवंश वाहतुक करणा­यां 06 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे. वरील दोन्ही घटनेत एकुण 14 ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यात आले असून, एकुण 403 गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे. 

        सदर घटनेत कुरखेडा येथील कारवाई करीता उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर तसेच सपोनि दिनेश गावंडे, अंमलदार राकेश पालकृतीवार, नरेश अत्यालगडे, जितेंद्र कोवाची, मनोज राऊत, रूपेश काळबांधे व पेंढरी येथील कारवाई करीता उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री. मयुर भुजबळ, पोउपनि श्री. गजानन सोनुने, नापोशि/विलास कुमरे, नापोशि/संदीप बागळे, पोशि/नितेश कढव, पोशि/शरद जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.


                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

                   EDITOR IN CHIEF

                 


Post a Comment

0 Comments