Header Ads Widget

Responsive Advertisement

"बालसंगोपन योजना "0ते18 वयोगटातील अनाथ.निराधार,निराश्रीत बालकांनी लाभ घेण्याचे आवाहन. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


0 ते 18 वयोगटातील अनाथ,निराधार,निराश्रीत बालकांसाठी बालसंगोपन योजना.


गडचिरोली/दि.04:  महिला  व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.या योजनेचा लाभ निकषाप्रमाणे विनामुल्य व कोणत्याही मध्यस्थाविना मंजूर करण्यात येतो. या योजनेचा लाभ मिळवून देण्सासाठी कोणत्याही मध्यस्थाने आर्थिक रकमेची मागणी केल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बॅरेक क्र.1 खोली क्र.26,27 जिल्हाधिकारी संकुल कॉम्पलेक्स गडचिरोली दुरध्वनी क्रृमांक 07132-222645 येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे. 

  योजना 0 ते 18 वयोगटातील अनाथ किंवा ज्याच्या पालकाचा पत्ता लागत नाही. जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके,एक पालक असलेली व कौटूंबिक संकटात असलेली बालके, मृत्यु, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार,पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटूंबातील बालके, कुष्ठरुग्णव जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके,एच.आय.व्ही ग्रस्त/बाधित बालके, तीव्र मतिमंद/एकाधिक अपंगत्व बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील संकटातील परिस्थिती मधील बालके,शाळेत व जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले )  बालके यांना बाल कल्याण समितीच्या मंजुरीने बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.    

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक

(EDITOR IN CHIEF).


Post a Comment

0 Comments