Header Ads Widget

Responsive Advertisement

सिरोंचा येथील मेडीगट्टा धरणाजवळील नदीकुडा गावाचे पुरपीढीत लोकांच्या हितासाठी त्वरित महसूल किंवा वनविभागाच्या सुरक्षित जागेवर त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी तहसीलदारांकडे बहुजन समाज पार्टी गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट व नदीकुडा गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

सिरोंचा येथील नदीकुडा गावातील पुरपीढीत लोकांच्या हितासाठी त्वरित महसूल किंवा वनविभागाच्या सुरक्षित जागेवर त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी तहसीलदारांकडे बहुजन समाज पार्टी गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट व नदीकुडा गावातील नागरिकांनी  निवेदनाद्वारे केली. P10NEWS 


गडचिरोली/सिरोंचा/दिं,19:-गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील नदीकुडा गाव हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असल्याने दरवर्षी पुराचा फटका बसत असुन या गावातील इतरत्र निवारा करून राहावा लागत आहे.सध्या उद्भवलेल्या गोदावरी नदीच्या पुरामुळे गावातील लोकांना गाव सोडुन जंगलात जाऊन निवारा करावा लागत आहे.त्यामुळे लोकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.जवळचंअसलेल्या मेडीगट्टा धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पुराची परिस्थिती भयानक होण्याची परिस्थिती आहे.मोठ्या प्रमाणात लोकांचा नुकसान होणार आहे.व बेहाल होणार आहे.तरी महसूल किंवा वनविभागाच्या सुरक्षित जागेवर नदीकुडा गावातील लोकांना पुनर्वसन त्वरित करण्याची मागणी निवेदनाद्वारे बहुजन समाज पार्टी गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट व नदीकुडा गावातील नागरिकांनी  तहसीलदार यांच्या मार्फतीने शासनाकडे केलेली  आहे.


             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments