Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्ह्यात चार ते पाच दिवस मुसळधार पावसानंतर बळीराजाच्या भात रोवणीला जोमात सुरू. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

गडचिरोली जिल्ह्यात चार ते पाच दिवस मुसळधार पावसानंतर बळीराजाच्या भात रोवणीला जोमात  सुरू. 

     गडचिरोली/16:-गडचिरोली जिल्ह्यात चार ते पाच दिवसांचा मुसळधार पावसाने पुराचा रोद्र रुपाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.दुबार पेरणीची वेळ आली.पण दुबार पेरणी करने म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.बळीराजा एकीकडे चिंतेत आहेत.


    तर दुसरीकडे जिल्ह्यातील बळीराजा आपल्या नेहमी प्रमाणे   मुसळधार पावसानंतर शेती भात रोवणीला सुरुवात केली.आणी खताची वाढती किमंत व मजुर, ट्रॅक्टर यांचा भाडेवाढ मुळे बळीराजा परेशान आहे.कारण धान्याचे हमीभाव वाढत नाही. यामुळे शेतीमध्ये केलेली लागत पेक्षा उत्पन्न कमी होतो.तरी सुद्धा बळीराजा घरची शेती राबायची या नव्या उमेदीने कामाला लागले व भात रोवणीला जोमात सुरू केली.

      तसेच यावर्षी बळीराजाला राज्य सरकारने बोनस दिला नाही.बोनस न मिळाल्याने दरवर्षी हि येणारी रक्कम शेतकऱ्यांना आतिशय मदत होत होती.पण या देशात कष्ट करणाराचं उपाशी मरतो हेच खरं ,या राज्यकर्त्यांना देव सद्बुद्धी देवो! 



                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments