Header Ads Widget

Responsive Advertisement

आम्ही बंडखोर शिवसैनिक नाही.अन्यायाविरुध्द आवाज उचलला आहे.-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

आम्ही बंडखोर नाही.सामान्य शिवसैनिक, अन्यायाविरुध्द आवाज उचलला आहे.-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना

सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तीन मोठ्या घोषणा

*रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.

*इंधनावरील व्हॅट कमी करणार

* महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार

महाराष्ट्र/04, मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसैनिकांची खच्चीकरण होत होती. शिवसेना पक्षाला वाचविण्यासाठी व शिवसेना पक्षातील साधारण कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा होत नव्हता.तर त्या सत्तेचा काय उपयोग असी खंत मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात बोलुन दाखवली.

आम्ही आजही शिवसैनिकचं आहोत.आणी मरेपर्यंत राहु,मा.बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी शिवसेना तयार झाली.त्या शिवसेनेसाठी व कार्यकर्त्यांसाठी जिव गेला तरी चालेल.

          विधानपरिषद व राज्यसभा निवडणूकी नंतर मी एकटाच सुसाट निघालो.माझ्या मनात ही अशी काही कल्पना नव्हती.पण प्रश्न मनात होते.ज्या पक्षाला वाढविण्यासाठी आपण जिवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं.त्या कार्यकर्त्यांना सत्तेत बसुन सुध्दा न्याय मिळत नाही.अनेकदा आम्ही उध्दव साहेब ठाकरे यांना खंत व्यक्त केली.पण ऐकणारा कोणी नाही.अनेक आमदार येत होते.आपली खंत व्यक्त करित होते.अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारच्या केसेस होत होते.सत्ता असुनही त्याचा उपयोग होत नव्हता.आपण पक्ष वाढविताना दिवस - रात्र एक केला.पंधरा- पंधरा दिवस बेधुंद पक्षासाठी फिरत होतो.आई, वडीलांना वेळ देऊ शकत नव्हतो.माझी दोन मुले मरण पावले.तेव्हा मी खचलो.एकाकी पडलो माझं आयुष्य संपलं असे म्हणतात खदखदत होतो.तेव्हा आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला.तुझ्या पाठीशी मी आहे.चल कामाला लाग.त्यातुन मला दिघे साहेबांनी सावरले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रडु लागले.प्रसंगी सांगताना जुन्या आठवणी ताज्या केल्या.ठाणे मधील 16 बार फोडल्याचे प्रसंग त्यांनी सांगितले.मग आम्ही गद्दार कसे.आम्हाला ॲटो चालविणारे ,रेडे प्रेत आत्मा,वेश्या,बाप काढले.असो आम्ही काहीही बोलणार नाही.आमचं खच्चीकरण करण होत आहे.व सामान्य शिवसैनिक व आमदारांना न्याय मिळत नाही.आमदारांच्या क्षेत्रात काम होतं नाही.त्यांच भविष्य धोक्यात आले होते.पण त्यांनी 50 आमदारांनी आपल्यावर विश्वास ठेवुन साथ दिली.त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.त्यांचा निवडुन येण्याची हमी मी देतो.जर त्याना धक्काही लागला तर मी राजकारणातून संन्यास घेऊन माझा नातु फुल टाईमपास आहे.पुन्हा शेती करु असे विधान केले.फळणविस आणि मी दोघे मिळून 200 आमदार निवडून आणू आणि आता प्रशासन चालविताना अहवाल येऊ द्या मग कारवाई केली जाईल असे नाही.डायरेक्त जिल्हाधिकारी यांना फोन काय आहे ते लवकर कारवाई करु तसेच त्यांनी बोलताना पंतप्रधान मोदी साहेब व अमित शहा यांची स्तुती केली.व इंधनावरील व् हॅट बंद करण्यात येईल असे विधान केले.अशाप्रकारे अनेक उलगडा केले व जे भल्या भल्यांना नाही जमलं आपण करुन दाखवले .ते आपण कसे केले छगन भुजबळ साहेब आपल्याला खाजगीत सांगतो.


  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपण शिवसैनिक आहोत गद्दार नाही.असं स्पष्ट केले.शिवसेंनेसाठी जिव गेला तरी चालेल.

                  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)





Post a Comment

0 Comments